रताळी आवडतात? पण रताळी खाण्याची योग्य वेळ असते, अन्यथा गंभीर दुष्परिणाम ठरलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:55 AM2021-12-09T11:55:25+5:302021-12-09T13:52:44+5:30

रताळी खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच ते अयोग्य वेळी खाल्ल्याने दुष्परिणामही होऊ शकतात.

benefits of sweet potato, know the right time to eat sweet potato | रताळी आवडतात? पण रताळी खाण्याची योग्य वेळ असते, अन्यथा गंभीर दुष्परिणाम ठरलेलेच

रताळी आवडतात? पण रताळी खाण्याची योग्य वेळ असते, अन्यथा गंभीर दुष्परिणाम ठरलेलेच

googlenewsNext

अनेकांना रताळी (Sweet potato) उकडून किंवा भाजून खायला आवडतात . त्यात लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, थायामिन आणि जस्त भरपूर प्रमाणात असते, जे शरीराच्या दिवसभराच्या गरजांसाठी पुरेसे असते. मात्र, रताळी खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच ते अयोग्य वेळी खाल्ल्याने दुष्परिणामही होऊ शकतात.

OnlyMyHealth च्या माहितीनुसार, जर तुम्ही रात्री रताळे खाल्ले तर त्यामुळे झपाट्याने वजन वाढू शकते. तसेच रात्री खाल्ल्याने बद्धकोष्ठता किंवा जुलाबाचा त्रासही (Right Time To Eat Sweet Potato) होऊ शकतो. डॉ. शुभम वात्स्या, सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, फरिदाबाद यांनी रताळी खाण्याची योग्य वेळ याबद्दल तपशीलवार माहिती दिली. चला तर मग जाणून घेऊया रताळे खाण्याची योग्य वेळ कोणती असावी.

रताळ्याचे फायदे

  • रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्याच्या सेवनाने इन्सुलिनचे उत्पादन आणि कार्य नियंत्रित करण्यास मदत होते.
  • रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर सामग्री टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी सुधारण्यास मदत करते.
  • रताळे पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त आहे.
  • हे बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्या टाळण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

रताळ्याचे तोटे

  • तुम्हाला हृदयविकार असल्यास आणि बीटा-ब्लॉकर्स औषधे घेतल्यास हे टाळावे.
  • ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी रताळे टाळावेत.

रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत शुगर पेशंटने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच खावे.

रताळे खाण्याची योग्य वेळ
वास्तविक, रताळ्यामध्ये उच्च कॅलरीज आढळतात. त्यात स्टार्च भरपूर प्रमाणात असते. अशा स्थितीत त्यात असलेले भरपूर पोषक तत्व पचायला आणि जास्त कॅलरीज बर्न करायला खूप वेळ लागतो. जर तुम्ही कॅलरीज बर्न करू शकत नसाल तर वजन झपाट्याने वाढू शकते. अशा स्थितीत रात्री रताळे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील बॉडी मास इंडेक्स बिघडतो आणि पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात.

तुम्ही सकाळी रताळे खाल्ले तर ते तुम्हाला दिवसभर चांगली ऊर्जा मिळेल. यामध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते. नाश्त्यातमध्ये रताळी खाणे फायदेशीर आहे. याशिवाय, तुमचे डोळे निरोगी ठेवण्याबरोबरच प्रजनन प्रणाली आणि हृदय आणि मूत्रपिंड यांसारख्या अवयवांसाठी देखील चांगले आहे.

Web Title: benefits of sweet potato, know the right time to eat sweet potato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.