वजन कमी करण्यासाठी असा करा बिटाचा ज्यूस; एका महिन्यामध्ये दिसेल फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:26 PM2019-10-15T15:26:23+5:302019-10-15T15:27:02+5:30

वजन कमी करणं अवघड कामांपैकी एक आहे. असं अजिबात नाही की, तुम्ही विचार केला आणि उद्या किंवा परवा तुमचं वजन कमी झालं. त्यासाठी तुम्हाला हेल्दी इटिंग हॅबिट्ससोबत वेट लॉस डाएट प्लॅन, एक्सरसाइज, वर्कआउट यांसारख्या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं.

Beetroot for weight loss beetroot benefits drink beetroot juice to loose weight | वजन कमी करण्यासाठी असा करा बिटाचा ज्यूस; एका महिन्यामध्ये दिसेल फरक

वजन कमी करण्यासाठी असा करा बिटाचा ज्यूस; एका महिन्यामध्ये दिसेल फरक

googlenewsNext

वजन कमी करणं अवघड कामांपैकी एक आहे. असं अजिबात नाही की, तुम्ही विचार केला आणि उद्या किंवा परवा तुमचं वजन कमी झालं. त्यासाठी तुम्हाला हेल्दी इटिंग हॅबिट्ससोबत वेट लॉस डाएट प्लॅन, एक्सरसाइज, वर्कआउट यांसारख्या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. असं होऊ शकतं की, तुम्ही जिम ट्रेनर किंवा डाएटिशिअनच्या म्हणण्यानुसार, एखादं डाएट प्लान तयार करून ठेवलं असेल. परंतु, तुम्हाला गरज असेल तर बिटाचाही तुमच्या डाएटमध्ये समावेश करू शकता. बिटापासून तयार करण्यात आलेला ज्यूस पिऊन तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. 

बीट कसं कमी करतं वजन? 

वजन कमी करण्यासाठी बीट एक हेल्दी उपाय आहे. बीट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. बीटामध्ये असणारी अनेक पोषक तत्व वजन कमी करण्यासाठीच नाहीतर केस आणि त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. हे शरीरामधील रक्ताची कमतरता दूर करतात. डायबिटीज, कोलेस्ट्रॉल यांसारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठीही मदत करतात. यामध्ये फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्ही तुमचं वजन कमी करत असाल तर ही पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी तुम्ही बिटाच्या ज्यूसचा वापर कसा करून घेऊ शकता. 

तयार करा गाजर आणि बिटाचा ज्यूस... 

हिवाळ्यात बाजारात गाजरांची अवाक् वाढते. अशातच दररोज गाजराचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी गाजर आणि बीटाचा ज्यूस मदत करतो. तसेच वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. सर्वात आधी गाजर आणि बीट स्वच्छ धुवून घेऊन त्याची साल काढा. तुकडे करून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चवीसाठ तुम्ही त्यामध्ये पुदिन्याची पानं एकत्र करू शकता. त्यानंतर पाणी, चिमुटभर मीठ एकत्र करून पुन्हा ब्लेंड करा. तुमचा ज्यूस तयार आहे. 

टोमॅटो आणि बीटाचा ज्यूस 

बीट आणि टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. दोन्ही कापून मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. त्यानंतर यामध्ये पुदिन्याची पानं आणि थोडंसं पाणी एकत्र करून बारिक करा. तुम्ही यामध्ये लिंबाचा रस आणि मीठही एकत्र करू शकता. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Beetroot for weight loss beetroot benefits drink beetroot juice to loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.