हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 10:52 AM2019-07-05T10:52:03+5:302019-07-05T10:55:38+5:30

आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.

Avoid these food for healthy heart tips | हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट!

हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट!

googlenewsNext

(Image Credit : eatrightnwise.com)

आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, ब्लड प्रेशर यांसारख्या आजारांच्या समस्यांचा सामना थोरामोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांनाही करावा लागत आहे. हृदय रोगांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टर्सही देत असतात. जर तुम्हीही तुमचं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी काही डाएट टिप्स शोधत असाल तर, जास्त विचार करू नका. त्यासाठी तुम्हाला विशेष मेहनत घेण्याची अजिबात गरज नाही. 

जेव्हा गोष्ट उत्तम हृदयासाठी असलेल्या हेल्थ टिप्सची असते, त्यावेळी तुम्हाला काही पदार्थांना कटाक्षाने स्वतःपासून दूर ठेवणं आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हृदयासाठी घातक असणाऱ्या पदार्थांबाबत सांगणार आहोत. जाणून घेऊया अशा काही पदार्थांबाबत... 

सोडिअमयुक्त पदार्थांचे कमी सेवन 

अनेक संशोधनांमधून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, ज्या व्यक्ती आहारात जास्त सोडिअम असणाऱ्या पदार्थांचा समावेश करतात, अशा व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. काही लोकांना सोडिअमच्या अतिसेवनाने हृदयाशी निगडीत इतरही आजार होण्याचा धोका असतो. 

शरीरातील सोडिअमचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त खाण्याच्या इतर पदार्थांमध्येही सोडिअम आढळून येते. त्यामुळे फक्त आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्याने शरीरातील सोडिअमचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे सोडिअमयुक्त पदार्थांची एक यादी तयार करा आणि आहारातील सोडिअमचे प्रमाण नियंत्रणात ठेवा. 

ट्रान्स फॅट्सपासून दूर रहा

हेल्दी हार्टसाठी सर्वात उत्तम हेल्थ टिप्स काही असेल तर ती म्हणजे, आहारामध्ये कमीत कमी ट्रान्स फॅट्स असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. आपल्या सर्वांच्या आहारामध्ये असे अनेक पदार्थ असतात, ज्यांच्यामध्ये ट्रान्स फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. 

डाएटमध्ये ट्रान्स फॅट्सपासून दूर राहण्यासाठी बटाट्यापासून तयार करण्यात आलेले आणि खासकरून तळलेल्या खाद्यपदार्थांपासून दूर राहा. तसेच तळलेल्या पदार्थांचेही जास्त सेवन करणं टाळा. 

जंक आणि फास्ट फूड 

बदलणाऱ्या जीवनशैलीमध्ये जंक फूड आणि फास्ट फूड आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. परंतु हे दोन्ही पदार्थांचे प्रकार हृदयासाठी हानिकारक ठरतात. जर तुम्हीही पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ खात असाल तर तुम्ही जास्त कॅलरीसोबतच सोडिअमही जास्त खात आहात. त्यामुळे हेल्दी हार्टसाठी या पदार्थांपासून दूर राहणचं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. 

फॅट आणि कोलेस्ट्रॉल असणारे पदार्थ 

नवनवीन पदार्थ खाण्याच्या अट्टाहासापोटी आपण अनेकदा अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल असणाऱ्या पदार्थांचे सेवन करतो. फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचे आजार बळावण्याची शक्यता आणखी वाढते. 

तळलेले मांसाहारी पदार्थ, लाल मांस आणि तळलेले इतर पदार्थ फॅट आणि कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या असतात. 

एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफेन पेय पदार्थ

हेल्दी हार्टसाठी एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफेन असणाऱ्या पदार्थांचे अधिक सेवन करणं शक्यतो टाळावं. त्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. कारण हे पेय पदार्थ शरीरातील ब्लड प्रेशर वाढविण्याचं काम करतात. चहा, कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्सचं सेवन नियमितपणे करणं टाळावं. 

नूडल्ससारख्या खाद्य पदार्थांपासून दूर रहा 

सध्याच्या जंक फूडच्या युगामध्ये नूडल्ससारखे खाद्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खाण्यात येतात. परंतु यांमध्ये सोडिअम आणि कॅलरीचे प्रमाण अधिक असतात. याव्यतिरिक्त नूडल्समध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाणही अधिक असते. 

सोडिअम, कॅलरी आणि कार्बोहायड्रेटच्या अधिक सेवनाने लठ्ठपणा आणि ब्लड प्रेशरची समस्या वाढते. ज्यामुळे कालांतराने हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. 

हार्ट अटॅक आणि हृदय रोगाची लक्षणं 

जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हार्ट अटॅकची लक्षणं (Symptoms Of Heart Attack) दिसून आली तर तुमच्या आहाराबाबत त्वरित सावध व्हा. कारण अशावेळी तुम्ही तुमचं डाएट कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं. 

डाएटव्यतिरिक्त एक्सरसाइजही आवश्यक 

पक्त डाएटमुळेच हार्ट हेल्दी राहत नाही तर त्यासोबतच शरीराला व्यायामाचीही गरज असते. त्यासाठी तुम्हाला दररोज अ‍ॅक्टिव्ह राहण्याचीही गरज असते. त्यासाठी दररोज कमीत कमी 6000 पावलं चालणं आवश्यक आहे. जर तुम्ही इतर व्यायामाचे प्रकार ट्राय करू शकत असाल तर  आरोग्यासाठी उत्तम असेल. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. 

Web Title: Avoid these food for healthy heart tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.