हिवाळ्यात स्वेटर घालून झोपणं ठरू शकतं घातक; 'या' समस्यांशी करावा लागू शकतो सामना 

By Manali.bagul | Published: January 7, 2021 11:48 AM2021-01-07T11:48:25+5:302021-01-07T12:08:55+5:30

Winter Care Tips in Marathi : अनेकदा अस्वस्थपणा, भीती वाटणं, ब्लड प्रेशर कमी होण्याचा समस्येचा सामना करावा लागतो.

Avoid sweaters warm clothes while sleeping in winter nights know its health risk | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपणं ठरू शकतं घातक; 'या' समस्यांशी करावा लागू शकतो सामना 

हिवाळ्यात स्वेटर घालून झोपणं ठरू शकतं घातक; 'या' समस्यांशी करावा लागू शकतो सामना 

googlenewsNext

हिवाळ्यात अनेकजण गरम कपडे वापरून स्वतःला थंडीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण गरम कपडे हे  Heat conductor असतात. यामुळे शरीराला ऊब मिळते. यामुळेच आपल्या शरीरात तयार होत असलेली गरमी लॉक होऊन बाहेर येऊ शकत शकतं नाही. साधारपणे सगळीकडेच रात्रीच्यावेळी गरम कपडे घालून लोक झोपतात. लहानात लहान निष्काळजीपणा आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला स्वेटरसारखे गरम कपडे घालून झोपल्यानं शरीरावर कोणते परिणाम होतात याबाबत सांगणार आहोत. 

एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. गरम कपडे घालून चादर ओढून झोपल्यानं शरीर गरम होतचं पण त्याचबरोबर अनेकदा अस्वस्थपणा, भीती वाटणं, ब्लड प्रेशर कमी होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. असा त्रास तीव्रतेने झाल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकत. म्हणून जर तुम्हाला गरम कपडे वापरायचेच असतील तर थर्मोकोट वापरू शकता. 

खाज येणं

सतत गरम कपडे वापरल्यामुळे एलर्जी, खाजेची समस्या उद्भवू शकते. मऊ त्वचेवर  ऊबदार कपड्यांच्या धाग्यामुळे खाज किंवा रॅशेज येण्याची शक्यता असते. तर तुमची त्वचा कोरडी असेल तर जास्त  त्रास होऊ शकतो. त्वचेवर दाणे येणं, चट्टे येणं, लाल पुळ्या अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून हिवाळ्यात स्वेटर घालून झोपाणं योग्य ठरत नाही. स्वेटर वापरायचंच असेल तर शरीरावर चांगल्या क्वालिटीचे लोशन लावायला हवे. यामुळे त्वचा मऊ राहते आणि एलर्जीची शक्यता कमी होते. Dont worry! चिकन खाल्यास बर्ड फ्लूचा धोका नाही; फक्त 'ही' काळजी घ्यावी लागणार, तज्ज्ञांचा सल्ला

डायबिटीस आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी धोकादायक

ऊबदार फॅब्रिकचे तंतू सहसा सूती कपड्यांच्या तंतुपेक्षा जाड असतात. त्या दरम्यान एक लहान इन्सुलेटर म्हणून काम करणारे एअर पॉकेट्स छोटे केले जातात. हिवाळ्यात अनेकजण ऊब मिळण्यासाठी चादर किंवा घोंगडी घेऊन झोपतात. जर आपण लोकरीचे कपडे देखील घातले तर लोकरीच्या कपड्यांचे तंतू आपल्या शरीराची उष्णता लॉक करतात. अशा परिस्थितीत, स्वेटरची उष्णता मधुमेहाच्या रुग्णांना आणि विशेषत: हिवाळ्याच्या हंगामात हृदय रुग्णांना धोकादायक ठरू शकते. म्हणून त्यांना स्वेटर घालून झोपायला परवानगी नाही. 'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती

लोकरीचे मोजे घालून झोपणं धोकादायक

तज्ञांचा असा विश्वास आहे की लोकरमध्ये चांगले थर्मल इन्सुलेशन असते, परंतु यामुळे घाम चांगला शोशला जात नाही. यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि फोड देखील येऊ शकतात. पाय कोरडे व उबदार वातावरणात चांगले राहतात. सूती कापडापासून बनवलेले मोजे केवळ आपल्या पायासाठीच सोयीस्कर नसून घाम भिजवून ठेवतात. म्हणून, लोकरी मोजे घालण्याऐवजी रात्री कॉटन मोजे घालण्याचा सल्ला दिला जातो. जर हिवाळ्यात हे फार महत्वाचे असेल आणि आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल तर अशा परिस्थितीत प्रथम सुती किंवा रेशीम कपडे घाला. 

(टिप : या लेखातील टिप्स आणि सल्ले हे केवळ माहितीसाठी आहेत. याकडे डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनल्सचा सल्ला म्हणून बघू नका. यात दिलेल्या माहितीचा आम्ही कोणताही दावा करत नाही. ही केवळ रिसर्चमधून समोर आलेली माहिती आहे. उपाय करण्यासाठी आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Avoid sweaters warm clothes while sleeping in winter nights know its health risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.