'हे' आहे लठ्ठपणाचं एक मोठं कारण, ज्याकडे सगळेच करतात दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:07 AM2020-03-18T10:07:26+5:302020-03-18T10:12:20+5:30

जगभरात लोकांना त्यांचं वाढतं वजन कमी करायचं आहे. मुळात वजन वाढण्याची समस्या ही लाइफस्टाईलमधील बदलांमुळे वाढली आहे.

Air pollution may be the main cause of your fat obesity and diabetes api | 'हे' आहे लठ्ठपणाचं एक मोठं कारण, ज्याकडे सगळेच करतात दुर्लक्ष!

'हे' आहे लठ्ठपणाचं एक मोठं कारण, ज्याकडे सगळेच करतात दुर्लक्ष!

Next

मुळात आपल्याला बालपणी वायु प्रदूषणाबाबत फार लोकांना माहीत नसतं. पण आजकाल लहान मुलांनाही हे माहीत असतं की, वायु प्रदूषणामुळे श्वास घेण्याचा आणि डोळ्यांसंबंधी समस्या होऊ शकते. वायु प्रदूषणामुळे अस्थमा, हृदयरोग हे होत असल्याचं जवळपास सर्वांनाच माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वायु प्रदूषण हे लठ्ठपणाचं देखील कारण ठरतं. चला जाणून घेऊ वायु प्रदूषणाने लठ्ठपणा कसा वाढतो.

जगभरात लोकांना त्यांचं वाढतं वजन कमी करायचं आहे. मुळात वजन वाढण्याची समस्या ही लाइफस्टाईलमधील बदलांमुळे वाढली आहे. आणि बिझी शेड्युलमुळे किंवा इतरही काही कारणांनी लोक त्यांच्या फिटनेसकडे हवं तेवढं लक्ष देऊ शकत नाहीत. 

वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. त्यात अलिकडे आलेली फास्ट फूड संस्कृती आणि आळशी लाइफस्टाईल आहे. काही ठिकाणी तर कुपोषण हे शरीरावर वाढत्या चरबीचं कारण आहे.

वायु प्रदूषण आहे आव्हान - लाइफस्टाईल सोबतच लठ्ठपणा वाढण्याचं आणखी एक मोठं कारण समोर येत आहे ते म्हणजे वायु प्रदूषण. जगभरात वायु प्रदूषण एक आव्हान ठरत आहे. वायु प्रदूषणामुळे केवळ पर्यावरणावरच नाही तर लोकांच्या आरोग्यावरही प्रभाव पडतो आहे. वेगवेगळळ्या आजारांचे लोक शिकार होत आहेत.

वायु प्रदूषणात जास्त वेळ राहिल्याने हवेतील प्रदूषणाचे कण श्वासांद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. हे कण आपल्या शरीरातील गरजेत्या बॅक्टेरियाचा खात्मा करतात. त्यामुळे या गुड बॅक्टेरियाचा विकास खुंटतो. अशात आपलं आरोग्य धोक्यात येतं. 

वायु प्रदूषणामुळे वजन कसं वाढतं ? - गुड बॅक्टेरियाच्या नुकसानामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते. शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवण्याची आणि फॅट बर्न करण्याची आपली क्षमता कमी होऊ लागते. याच कारणाने वेगवेगळ्या आजारांचा आपल्याला सामना करावा लागतो. यात डायबिटीस आणि लठ्ठपणा यांचा समावेश आहे.

वैश्विक समस्या - असं अजिबात नाही की, वायु प्रदूषण ही कोणत्या एका देशाची समस्या आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांसाठी वायु प्रदूषण घातक ठरत आहे. जगातल्या सर्वात जास्त प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये भारतातील दिल्लीचा समावेश आहे. त्यामुळे येथील लोकांचं आरोग्य दिवसेंदिवस ढासळत आहे.

कशी घ्यावी काळजी - सामान्यपणे वायु प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करा की, अशा ठिकाणी रहा जिथे ही समस्या कमी आहे. तुम्ही घरात प्रदूषण कमी करू शकता. जसे की, स्मोकिंग, अगरबत्ती किंवा धूपबत्ती, जास्त तेल-मसाले न खाणे. सकाळी वॉक करा आणि नियमित एक्सरसाइज करा. या गोष्टींनी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.


Web Title: Air pollution may be the main cause of your fat obesity and diabetes api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app