भारतात प्रदूषणाची स्थिती गंभीर, ५ वर्षेही जगू शकत नाहीत एक लाख लहान मुलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 10:17 AM2019-06-05T10:17:24+5:302019-06-05T10:25:16+5:30

जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे.

Air pollution kills an average of 8.5 out of every 10,000 children in India before they turn five says CSE report | भारतात प्रदूषणाची स्थिती गंभीर, ५ वर्षेही जगू शकत नाहीत एक लाख लहान मुलं!

भारतात प्रदूषणाची स्थिती गंभीर, ५ वर्षेही जगू शकत नाहीत एक लाख लहान मुलं!

Next

(Image Credit : Down To Earth)

जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसत आहे. अनेक जीवघेण्या आजारांचा धोका प्रदूषणामुळे होतो आहे. सीएसई(सेंटर ऑफ सायन्स अ‍ॅंन्ड एन्व्हायर्नमेंट) च्या एका रिपोर्टनुसार, देशात दरवर्षी १ लाख लहान मुलं प्रदूषित हवेमुळे पाच वर्षाच्या आतच जीव गमावत आहे. वायु प्रदूषणामुळे देशात ५ वयापेक्षा कमी वयाच्या दर १० हजार मुलांपैकी सरासरी ८ पेक्षा अधिक लहान मुलांचा मृत्यू होत आहे. मुलींमध्ये हे प्रमाण अधिक जास्त आहे. दरवर्षी दर १० हजार मुलींपैकी सरासरी ९ पेक्षा अधिक मुलींचा त्या पाच वर्षांच्या होण्याआधीच प्रदूषणामुळे मृत्यू होत आहे.

१५ ते १६ मिलियन इ-व्हेइकल आणण्याचं लक्ष्य

(Image Credit : medscape.com)

पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायर्नमेंट -२०१९ चा रिपोर्ट जाहीर करण्यात आला. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतात होणाऱ्या एकूण व्यक्तींचा मृत्युमध्ये प्रदूषणामुळे १२ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होतो आहे. हेच कारण आहे की, २०२० पर्यंत भारतात १५ ते १६ मिलियन इ-व्हेइकल आणण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे.

या राज्यांमध्ये सर्वात जास्त जलप्रदूषण

(Image Credit : Livemint)

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ८६ वॉटर बॉडीज गंभीर प्रदूषणाच्या जाळ्यात आहेत. यातील सर्वात जास्त जलप्रदूषण कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये आहे. २०११ ते २०१८  दरम्यान या राज्यांमध्ये प्रदूषित इंडस्ट्रींची संख्या साधारण १३६ टक्क्यांनी वाढली आहे. २४ तास चालणारे पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये ३५ टक्के कमतरता आली आहे. भारताची मोठी समस्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये २२ राज्यांमध्ये ७९ मोठी आंदोलने घाण पसरवणाऱ्या लॅंडफिल साइट आणि डंप यार्डबाबत झाले आहेत. 

शाळांमध्ये मुलांचं आरोग्य धोक्यात

(Image Credit : Development News)

अनेक सर्व्हेंमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, जगभरात दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी आहे. याच राजधानीतील शाळा अधिकच प्रदूषित आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून क्लीन एअर एशियाने शाळांमधील प्रदूषणावर अभ्यास केला. यात दिल्लीच्या भुवनेश्वर आणि नागपूरच्या शाळांचा समावेश करण्यात आला. टेरी स्कूल ऑफ अ‍ॅडव्हांस स्टडीजमध्ये आयोजित बीट एअर पलूशन वर्कशॉपमध्ये क्लीन एअर एशियाच्या प्रोजेक्ट अधिकारी प्रेरणा शर्मा यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये आम्ही हा रिसर्च केला होता. शाळांच्या आजूबाजूचं ट्रॅफिक प्रदूषण अधिक वाढवतं. काही शाळांमध्ये प्ले ग्राऊंड आणि बस पार्किंग जवळजवळ आहेत. अशात मुलं थेट प्रदूषणाच्या जाळ्यात येत आहेत. 

Web Title: Air pollution kills an average of 8.5 out of every 10,000 children in India before they turn five says CSE report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.