अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा

By manali.bagul | Published: January 29, 2021 05:07 PM2021-01-29T17:07:51+5:302021-01-29T17:26:54+5:30

या औषधामुळे नलिका आणि पेशींमध्ये वाईट कॉलेस्ट्रॉल रोखण्यास मदत होऊ शकते.

Aiims delhi doctors made new medicine of diabetes at science | अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा

अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा

Next

एम्स दिल्लीतील डॉक्टरांनी  डायबिटीसने पिडीत रुग्ण आणि  कोरोना संक्रमित  रुग्णांच्या उपचार पद्धतींवर अभ्यास केला होता. एम्सच्या डॉक्टरांनी एलोपेथी आणि आयुर्वेदीक पद्धती मिळून एक औषध तयार केलं आहे. डॉक्टरांनी दावा केला आहे की या उपचारांनी डायबिटीस रुग्णांना कोरोना संक्रमण काळात दिलासा मिळू शकतो. यासह संबंधित आजारांनाही कमी करता येऊ शकतं. या अभ्यासानुसार एक दावा करण्यात आला आहे की एलोपेथीचे एक औषध आणि बीजीआर ३४  एकत्र दिल्यानं डायबिटीस वेगानं कमी होण्यास मदत होते. याशिवाय या आजारामुळे वाढणारा हार्ट अटॅक आणि मृत्यूचा धोका कमी करता येऊ शकतो. या  औषधामुळे नलिका आणि पेशींमध्ये वाईट कॉलेस्ट्रॉल रोखण्यास मदत होऊ शकते.

याआधीही तेहरान युनिव्हरर्सिटीतील वैज्ञानिकांनी एंटी ऑक्सि़डेंट्सनी परिपूर्ण असलेल्या औषधांच्या वापरानं डायबिटीसच्या रुग्णांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी असतो. याबाबतचे संशोधन प्रकाशित केले होते. सीएसआयआरद्वारे विकसित करण्यात आलेले आयुर्वेदिक औषध बीजीआर-३४ च्या  एंटी डायबिटीक क्षमतेबाबत माहिती मिळवण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांनी  हे संशोधन केले होते. 

AIIMS Delhi Doctors made new medicine of Diabetes

एम्स फॉर्मोकोलॉजी विभागाचे डॉ. सुधीर चंद्र सारंगी यांच्या निरिक्षणासाठी हा अभ्यास केला जात आहे. तीन टप्प्यात हा अभ्यास केला जात आहे.  सगळ्यात पहिल्या टप्प्यातील चाचणी जवळपास  दीड वर्ष आधी करण्यात आली होती.  याचे परिणामही खूप उत्सावर्धक होते. या अभ्यासानुसार बीजीआर ३४ आणि एलोपेथिक औषध ग्लिबेनक्लामीडचे पहिल्या टप्प्यातील परिक्षण करण्यात आले. त्यानंतर परिणामांची तुलना केल्यानंतर दिसून आलं की, एकाचवेळी दोन औषध दिल्यानंतर  दुप्पट परिणाम दिसून येतो. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वेगानं वाढते. लॅप्टीन हार्मोनचा स्तर कमी व्हायला सुरूवात होते. 

तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

विजयसार, दारूहरिद्रा,  गुळवेळ, मिथका यांसारख्या जडीबुटींवर लखनौमधील सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ मेडिसिनल एंड एरोमॅटीक प्लांट्स आणि नॅशनल बॉटनिकल रिसर्च इंस्टिट्यूटमधील अभ्यासानंतर  बीजीआर ३४  चा शोध लावण्यात आला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार इंन्सुलिनचा स्तर वाढल्यानं जिथं डायबिटीस नियंत्रणात राहतो. तिथे लेप्टीन  हार्मोन कमी  झाल्यामुळे मेटाबॉलिज्म आणि अन्य नकारात्मक प्रभाव कमी होतात.  इतकंच नाही तर याच्या वापरानं कोलेस्ट्रॉलमधील ट्रायग्लिसराईड् एवं वीएलडीएल स्तर कमी होतो.  डायबिटीसच्या  रुग्णांमथ्येही हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते. एचडीएलचा स्तर वाढल्यामुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेजची समस्या उद्भवत नाही. वजन कमी करण्यासाठी रोज नेमकं किती चालावं? जाणून घ्या कॅलरी बर्न करण्याचा खास फंडा....

Web Title: Aiims delhi doctors made new medicine of diabetes at science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.