92 year old man : जबरदस्त इच्छाशक्ती! ४ वेळा हार्ट अटॅक येऊन नाशिकच्या ९२ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 06:14 PM2021-04-26T18:14:27+5:302021-04-26T18:43:11+5:30

92 year old man : या आजोबांचे नाव नामदेव किसन शिंदे असून ते रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नामदेव शिंदे हे गेल्या 26 दिवसांपासून कोरोना विषाणूचा सामना करत होते.

92 year old man overcame corona despite suffering four heart attacks and other health issue manmad | 92 year old man : जबरदस्त इच्छाशक्ती! ४ वेळा हार्ट अटॅक येऊन नाशिकच्या ९२ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

92 year old man : जबरदस्त इच्छाशक्ती! ४ वेळा हार्ट अटॅक येऊन नाशिकच्या ९२ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

Next

कोरोना व्हायरसची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे लोकांमध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेड्स उपलब्ध नसणं,  रेमडेसिविरचा तुटवडा यामुळे कोरोना झाल्यानंतर प्रचंड हाल होणार, आपण या आजारातून बाहेर येणार की नाही ? अशी भीती लोकांच्या मनात आहे. दरम्यान एका ९२ वर्षीय आजोबांनी कोरोना व्हायरसवर मात केल्याची सकारात्मक (CoronaVirus Positive News )  माहिती समोर येत आहे.

नाशिकच्या मनमानमधील रहिवासी असलेल्या 92 वर्षीय वयोवृद्ध रुग्णाने हृदयविकाराचे चार झटके येऊनही कोरोनाला हरवलं आहे. विविध शारीरिक आजारांनी ग्रस्त असतानाही कोरोनाला हरवल्यानं त्यांच्या जिद्दीचं आणि सकारात्मकतेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. 

 आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

या आजोबांचे नाव नामदेव किसन शिंदे असून ते रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नामदेव शिंदे हे गेल्या 26 दिवसांपासून कोरोना विषाणूचा सामना करत होते. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. तरीही त्यांनी बरं होण्याची आशा सोडली नाही. अखेर २६ दिवस कोरोनाशी सामना करून ठणठणीत बरे होऊन आजोबा घरी परतले. अशा ताणतणावपूर्ण वातावरण आपले आजोबा बरे झाल्यामुळे घरच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

गंभीर आजार असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु 92 वर्षीय किसन शिंदे यांना एकूण चार वेळा हृदयविकाराचा झटकाही आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची गुंतागुंतीची आणि जटील शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त त्यांना उच्च रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा त्रासही आहे. असं असताना त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.

म्हणून त्यांचे उदाहरण सगळ्यांसाठीच आदर्श ठरलं आहे. आजोबांनी सांगितले की, ''कोरोनाला  न घाबरता जाता सकारात्मक विचार ठेवले आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्यवेळी औषधं घेतली तर कोरोनावर नक्कीच मात  करता येऊ शकते.'' 

Web Title: 92 year old man overcame corona despite suffering four heart attacks and other health issue manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.