कॅन्सरसारख्या आजाराबाबत सांगायचं झालं तर यावर उपचार करण्याआधीच हा आजार होऊ नये याची काळजी घेणे. ही बाब प्रोस्टेट कॅन्सरवर अधिक लागू पडते. प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे कर्करोग पुरूषांमध्ये फार कॉमन आहे. या आजाराची अनेक लोक लढत आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. काही दिवसांपूर्वी वैज्ञानिकांनी काही फूड आयटम्स शोधून काढले जे हा आजार दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. रिसर्चनुसार, सफरचंद, हळद आणि बेरीज या तीन फूडच्या मदतीने प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकतो.

कसा केला रिसर्च?

वैज्ञानिकांनी १४२ नॅच्युरल कंपाउंड्सवर टेस्ट केल्यात. हे कंपाउंड म्हणजेच तत्व हळद, सफरचंद आणि द्राक्षांमध्ये आढळतात. यांच्या मदतीने कॅन्सर सेल्सची ग्रोथ कमी करण्यास फार मदत होते, असा दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. हे प्लांट बेस्ड कंपाउंड्सची उंदरांवर आणि मनुष्यांच्या सेल्सवर टेस्ट करण्यात आली. ज्यातून हे समोर येतं की, हे प्रोस्टेट कॅन्सरसाठी सर्वात फायदेशीर आहे.

रिसर्चमधून समोर आले की,  सफरचंदाच्या सालीमध्ये आढळणारं अर्सोलिक अ‍ॅसिड हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्यूमिन आणि द्राक्ष-बेरीजमध्ये आढळणारा रिजवेराटॉल कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फार इफेक्टिव आहे.

हे तत्व फायदेशीर का?

एखाद्या इन्फेक्शन किंवा ऑटोइम्यून डिजीजने झालेल्या इन्फ्लेमेशननंतर डॅमेज झालेल्या सेल्समध्ये म्यूटेशन असतं. हे तीन प्लांट बेस्ड पोषक तत्व हा धोका टाळू शकतात.

काय आहे प्रोस्टेट कॅन्सर?

प्रोस्टेट कॅन्सर (पुरुष जननेंद्रियातील ग्रंथीचा कर्करोग) हा पुरुषांना होतो. इतर कॅन्सरपैकी हा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. हा कॅन्सर हा हळूहळू वाढतो. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या स्थितीत हा पुरुष जननेंद्रियाच्या ग्रंथीपर्यंतच मर्यादित असतो.

प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षणे कोणती?

सुरुवातीला काही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये लघवीत अडथळा येणे, लघवीची गती कमी होणे, वीर्यातून रक्त येणे, हाडे दुखणे, ‘इरेक्टायल डिसफंक्शन’ सारखेही लक्षणे दिसून येतात.

 


Web Title: 3 food are super effective against prostate cancer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.