शिक्षण विभागाचे मिशन ‘झिरो ड्रॉप बॉक्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:00 AM2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:15+5:30

‘ड्रॉप बॉक्स’ निरंक कसे करता येईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. विद्यार्थी निहाय माहिती कशी काढावी, शाळाबाह्य मुलांची सांख्यीकी माहिती, उपाययोजना, नियोजन व केस स्टडी लिहिण्याची पद्धत, बालरक्षक नोंदणी लिंक व टास्क लिंक यावर सखोल माहिती देऊन यंत्रणा कामाला लागली आहे

Zero Drop Box Mission of Education Department | शिक्षण विभागाचे मिशन ‘झिरो ड्रॉप बॉक्स’

शिक्षण विभागाचे मिशन ‘झिरो ड्रॉप बॉक्स’

Next
ठळक मुद्दे११९ शाळाबाह्य मुले शोधणार : १४ हजार ८५७ विद्यार्थी ‘ड्रॉप बॉक्स’ मध्ये

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या वर्षीही सारखी असायला पाहिजे. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने विद्यार्थी गेले कुठे हे शोधण्यासाठी ‘मिशन ड्रॉप बॉक्स’ सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून ही संख्या शून्यावर आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने सुरू केला आहे.
जिल्ह्यात वर्ग १ ते ४ पर्यंतचे २७ हजार विद्यार्थी, वर्ग ५ ते १० चे आठ हजार ३६० विद्यार्थी व वर्ग ११ ते १२ चे सहा हजार ४७० विद्यार्थी ‘ड्रॉप बॉक्स’ मध्ये आहेत. ^६ ते ७ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य व दिव्यांग ११ मुले व नऊ मुली तसेच विशेष प्रशिक्षणांतर्गत बालकांची प्रस्तावित संख्या ५० मुले व ४९ मुली अशा एकूण ११९ शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार आहे. जिल्ह्याची स्थिती बघता वर्ग १ ते १२ पर्यंतचे १४ हजार ८५७ ही संख्या शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘मिशन ड्रॉप बॉक्स’ निरंक करण्यासाठी ३० आॅगस्ट ही डेडलाईन दिली आहे.
शिक्षण विभागाला शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे आणायचे यावर माहिती देण्यात आली. ‘ड्रॉप बॉक्स’ निरंक कसे करता येईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. विद्यार्थी निहाय माहिती कशी काढावी, शाळाबाह्य मुलांची सांख्यीकी माहिती, उपाययोजना, नियोजन व केस स्टडी लिहिण्याची पद्धत, बालरक्षक नोंदणी लिंक व टास्क लिंक यावर सखोल माहिती देऊन यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक मूल शाळेच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे. त्यासाठीच बालरक्षक चळवळ सुरु करण्यात आली आहे. बालरक्षकांमध्ये आत्मीयता व सहानभूतीची आवश्यकता आहे. याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
काय आहे ‘ड्रॉप बॉक्स’
मोहीम इयत्ता १ ते १२ वी पर्यतच्या मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व यंदा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांची पटसंख्या काढली जाते. मागीलवर्षी जेवढे विद्यार्थी उर्तीण झाले तेवढ्याच विद्यार्थ्यांची पटसंख्या पुढील वर्गात असणे आवश्यक आहे. मात्र ती मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १४ हजार ८५७ ने कमी आढळली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला अथवा हे विद्यार्थी शाळाबाह्य झाले किंवा त्यांचे दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरण झाले. याचा शोध घेण्याच्या मोहिमेला ‘मिशन ड्रॉप बॉक्स’ हे नाव देण्यात आले आहे.
आठ दिवसात शून्य गाठा
बालरक्षक व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी आठ दिवसात ‘ड्रॉप बॉक्स’ मधील विद्यार्थी संख्या शून्यावर आणण्याचा उपक्रम राबविण्याचे शिक्षणाधिकारी(प्राथ) राजकुमार हिवारे यांनी सांगितले. बालरक्षक चळवळ गतीने होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहे.

Web Title: Zero Drop Box Mission of Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.