सिव्हिल लाईन्सच्या तरूणांनी सुरू केले पोळी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:31+5:30

आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला सुमारे ३ हजार लोकांच्या दोन वेळचे भोजन तसेच दोन वेळच्या चहा-बिस्कीटची व्यवस्था करावी लागत आहे.

Youth of the civil lines started collection 'chapati ' | सिव्हिल लाईन्सच्या तरूणांनी सुरू केले पोळी संकलन

सिव्हिल लाईन्सच्या तरूणांनी सुरू केले पोळी संकलन

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक घरातून प्रत्येकी ५ पोळ््या : खालसा सेवा दलला करीत आहेत मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील विविध दवाखान्यात अडकून पडलेल्या तसेच येथील म्युनिसीपल शाळेत थांबविण्यात आलेल्या बेघर लोकांच्या भोजनाची जवाबदारी वहन करणाऱ्या खालसा सेवा दलच्या मदतीसाठी सिव्हील लार्ईन्स परिसरातील तरूणही धावून आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ तसेच नगर बजरंग दलचे कार्यकर्ते हे तरूण परिसरातील घरांतून पोळ््यांचे संकलन करून खालसा सेवा दलला देत आहेत.
सन २०१८ पासून भुकेल्यांना भोजन वितरण करण्याचे कार्य येथील खालसा सेवा दल करीत आहे. आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला सुमारे ३ हजार लोकांच्या दोन वेळचे भोजन तसेच दोन वेळच्या चहा-बिस्कीटची व्यवस्था करावी लागत आहे. विशेष म्हणजे, सध्या स्थितीत घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने कित्येकांना त्यांना मदत करण्याची इच्छा असूनही काहीच करता येत नसल्याचे दिसत आहे.
अशात फुलचूर येथील जय बम्लेश्वरी कॉलनीतील तरूण पुण्याच्या या कामात आपला हातभार लागावा यासाठी कॉलनीतील सुमारे ५५ घरांतून दररोज सकाळी पोळ््यांचे संलन करीत आहेत. संकलीत करण्यात आलेल्या पोळ््या ते खालसा सेवा दलला देऊन त्यांना हातभार लावत आहेत. गरजूंसाठी आपणही काही करावे हीच इच्छा बाळगून शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ व नगर बजरंग दलचे कार्यकर्ते पुढे आले आहे.
बजरंग दलचे मुंबई क्षेत्र संयोजक देवेश मिश्रा, राजा गिºहे, अंकुश कुलकर्णी, हरीश चेतवानी, विक्की चव्हाण, संदेश मिश्रा,सुरेश तितिरमारे, बुल्ला सोनी व त्र्यबंक जरोदे यांनी खालसा सेवा दलला पोळ््यांच्या स्वरूपात हातभार लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आता शनिवारपासून (दि.२८) हे तरूण परिसरातील सुमारे ३५ घरांतून प्रत्येकी ५ पोळ््या दररोज सकाळी संकलीत करीत असून खालसा सेवा दलला देत आहेत.
खालसा सेवा दलकडून सुमारे ३ हजार लोकांना भोजनाची सुविधा केली जात असल्याने त्यांना थोडाफार हातभार लावता यावा हाच यामागचा उद्देश असून आता आणखीही घरे वाढणार असल्याचे देवेश मिश्रा यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले.

परिसरातील सुरू केले सॅनिटायझेशन
कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी सर्वत्र सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे. नगर परिषदेने मुख्य चौकांमध्ये सॅनिटायझेशन केले असून आता प्रभागांत अंतर्गत भागातही केले जात आहे. तर काही नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चातून सॅनिटायजेशन करत आहेत. या तरूणांनीही स्वखर्चातून परिसरात सॅनिटायजेशन सुरू केले असून घरोघरी जाऊन हे कार्य केले जात आहे.

Web Title: Youth of the civil lines started collection 'chapati '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.