कुणाला मिळणार पेट्रोल पंप,काेण वाजविणार शिट्टी तर कुणाला मिळणार नारळ व लिफाफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 05:00 AM2021-01-03T05:00:00+5:302021-01-03T05:00:27+5:30

चिन्ह सुध्दा मजेदार असून पेट्रोल पंप, नारळ, शिटी, नारळ, फुलकोबी, ढोबळी मिरची, फळा, पुस्तक, विहीर, जेवणाची थाळी, डोेक्यावरचा भारा, काचेचा पेला, कंगवा, पोळपाट बेलणे भूईमूंग, वटाणा आदी मजेदार चिन्ह आहेत. त्यामुळे कुणाला मिळेल पेट्रोल पंप, कोण वाजविणार शिटी अन कोणत्या उमेदवाराला मिळणार नारळ अन लिफाफा हे ४ जानेवारीला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना या निवडणूक चिन्हावर मते मागता बराच विनोद देखील होणार आहे. 

Who will get a petrol pump, who will blow a whistle and who will get a coconut and an envelope | कुणाला मिळणार पेट्रोल पंप,काेण वाजविणार शिट्टी तर कुणाला मिळणार नारळ व लिफाफा

कुणाला मिळणार पेट्रोल पंप,काेण वाजविणार शिट्टी तर कुणाला मिळणार नारळ व लिफाफा

googlenewsNext
ठळक मुद्दे१८९ ग्रामपंचायतींची निवडणूक : ४ जानेवारीला होणार चिन्ह वाटप, उमेदवारांचे लागले लक्षकमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उमेदवारांच्या नजरा ४ जानेवारीला होणाऱ्या निवडणूक चिन्ह वाटपाकडे लागली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने १९० निवडणूक चिन्हांचा पर्याय ठेवला आहे. त्यातील चिन्ह सुध्दा मजेदार असून पेट्रोल पंप, नारळ, शिटी, नारळ, फुलकोबी, ढोबळी मिरची, फळा, पुस्तक, विहीर, जेवणाची थाळी, डोेक्यावरचा भारा, काचेचा पेला, कंगवा, पोळपाट बेलणे भूईमूंग, वटाणा आदी मजेदार चिन्ह आहेत. त्यामुळे कुणाला मिळेल पेट्रोल पंप, कोण वाजविणार शिटी अन कोणत्या उमेदवाराला मिळणार नारळ अन लिफाफा हे ४ जानेवारीला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना या निवडणूक चिन्हावर मते मागता बराच विनोद देखील होणार आहे. 
ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाखाली लढविली जात नाही. ही पक्ष विरहित निवडणूक असते. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या चिन्हांवर उमेदवारांना निवडणूक लढवावी लागते. मात्र या निवडणुकीत निवडणूक विभागानेे चिन्हांची संख्या वाढवून १९० केली आहे. यातील बरेच चिन्ह मजेदार असून कुणाला भूईंग मिळते किवा वटणा मिळतो याकडे लक्ष आहे. 

वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
ग्रामपंचायतची निवडणूक ही पक्ष विरहीत असते. एक वाँर्ड एक मतदारसंघ या नियमानुसार निवडणूक लढविली जाणार आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे एका वाँर्डात एकच चिन्ह असणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप ४ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने १९० चिन्ह निश्चित केले आहे. या चिन्हामधून उमेदवारांना चिन्ह निवडावे लागणार आहे. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 
-स्मिता बेलपत्रे, निवडणूक अधिकारी, 

अशी आहेत चिन्ह
 निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट,सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली,केक,कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, टीव्ही, रिमोट. 
कंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चश्मा, हॉकी, ईस्त्री, जग, केटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढाई, पेन ड्राईव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली, चिमटा, नांगर, चावी.
फलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवण, यंत्र, स्कूटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाईप राईटर, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर, सूप, रोडरोलर, कुलर.

पाण्याची टाकी, सुई, विहीर या नवीन चिन्हांची पडली भर पडली भर
 फळा, पुस्तक, साबण, टुथब्रश, चहा गाळणी, तंबू, भाला फेकणारा, डोक्यावरील भारा,ब्रिफकेस, पेट्रोल पंप, चालण्याची काठी, वाँल हूक, बिगुल, तुतारी, लिफाफा, कलिगंड, हिरवी मिरची, भेंडी, जेवणाची थाळी, पेन ड्राईव्ह, माऊस, खिडकी, डिझलपंप, मण्यांचा हार, बिस्कीट, गरम पाण्याचे हिटर, फुलकोबी, खटारा, गालीचा, पोळपाट बेलणे, होडी, फलंदाज, बाकडे, दोने पाने, बंगला आदी नवीन चिन्हांची भर पडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक राहत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांच्या संख्येत वाढ केली आहे. 

 

Web Title: Who will get a petrol pump, who will blow a whistle and who will get a coconut and an envelope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.