The truck hit; Biker killed | ट्रकची धडक; दुचाकीस्वार ठार
ट्रकची धडक; दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (दि.१६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील मुंडीपार गावाजवळ घडली. रवी गुलाब राणे, रा.सेजगाव खुर्द असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. घटनेनंतर चालकाने ट्रक सोडून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे व सरपंच नितिन टेंभरेसह अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
प्राप्त माहितीनुसार रवी हा आपल्या मोटारसायकल क्र.एम-एच-३१-एफ-डी ६७०८ ने पाहुण्यांना घेण्यासाठी मुंडीपार येथील बसस्थानाकडे जात होता. दरम्यान विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक क्र मांक सी-जे-०७-सी-ए-५३१४ ने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात रवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर ट्रक हा गोंदिया येथून धानाचे पोती घेऊन एमआयडीसीतील राईस मिलमध्ये जात होता. दरम्यान या अपघाताची माहिती परिसरातील गावकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच घटनास्थळावर पोहचून ट्रक चालकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. त्यामुळे घटनास्थळी गोळा झालेल्या गावकºयांनी ट्रकची तोडफोड करुन ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. ट्रकला लावलेल्या आगीवर पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी घटना टळली. गंगाझरी पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाविरु ध्द गुन्हा दाखल करु न चालकाचा शोध सुरु केला आहे.


Web Title: The truck hit; Biker killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.