नदीच्या पात्रात बुडणाऱ्या तीन युवकांना वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:12+5:30

आंघोळ करण्यासाठी खोल पाण्यात गेल्याने दरवर्षी या ठिकाणी एक दोन जणांचा बुडून मृत्यू होतो. त्यामुळे या घटनांची यंदा पुनर्रावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने बिरसोला संगमघाट येथे तंबू ठोकले होते. तसेच वैनगंगा नदीच्या पात्रात जास्त खोल पाण्यात आंघोळ करण्यासाठी जाऊ नये अशा सूचना ते भाविकांना करीत होते.

Three youths rescued by drowning | नदीच्या पात्रात बुडणाऱ्या तीन युवकांना वाचविले

नदीच्या पात्रात बुडणाऱ्या तीन युवकांना वाचविले

Next
ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला यश : बिरसोला संगमघाट येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील बिरसोला संगमघाट येथे वैनगंगा नदीच्या पात्रात मकर संक्रांती निमित्त आंघोळ करण्यासाठी गेलेले तीन युवक नदीच्या पात्रात बुडाले होते. दरम्यान या ठिकाणी तैनात असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव चमूने वेळीच प्रसंगावधान दाखवित बुडलेल्या तीन युवकांना सुखरुपपणे बाहेर काढले. ही घटना बुधवारी (दि.१५) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
कार्तिक रहांगडाले (२०) रा. बाघोली, कपिल देवधारी(२१), विशाल खैरवाल रा.बाजारटोला, ता.गोंदिया असे वैनगंगा नदीच्या पात्रातून सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. मकरसंक्राती निमित्त तालुक्यातील बिरसोला संगमघाट येथे मोठी यात्रा भरते. मकरसंक्रातीच्या दिवशी या नदीत स्थान केल्याने सर्व पाप व संकट दूर होतात असा या भागातील नागरिकांचा समज आहे. त्यामुळे दरवर्षी बिरसोला संगमघाट येथे वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी हजोरो भाविक येतात. आंघोळ करण्यासाठी खोल पाण्यात गेल्याने दरवर्षी या ठिकाणी एक दोन जणांचा बुडून मृत्यू होतो. त्यामुळे या घटनांची यंदा पुनर्रावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने बिरसोला संगमघाट येथे तंबू ठोकले होते. तसेच वैनगंगा नदीच्या पात्रात जास्त खोल पाण्यात आंघोळ करण्यासाठी जाऊ नये अशा सूचना ते भाविकांना करीत होते. दरम्यान बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तीन युवक नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी गेले. मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्या बुडायला लागले.
घाटावर तैनात असलेल्या बचाव पथकाच्या लक्षात ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पाऊले उचलीत बुडत असलेल्या तीन्ही युवकांना सुखरुपपणे बाहेर काढले. बचाव पथकाच्या प्रसंगावधानामुळे तीन युवकांना नदीत बुडण्यापासून वाचविल्याने घाटावर उपस्थित भाविकांनी त्यांचे आभार मानले.

सोशल मीडियातून जनजागृती
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मंकरसंक्राती निमित्त नदी घाटावर होणारी भाविकांची गर्दी आणि योग्य काळजी न घेतल्याने होणाऱ्या घटना लक्षात घेऊन यावर्षी विशेष उपाय योजना केल्या. तसेच फेसबुक,व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून यामाध्यमातून तीन चार दिवसापासून जनजागृती सुरू केली आहे. तसेच या ठिकाणी घडलेल्या घटनांचे दाखले देखील संदेशाच्या माध्यमातून दिले.या जनजागृती मोहीमेची सुध्दा मोठी मदत झाली.
बचाव पथकात यांचा समावेश
बुधवारी बिरसोला घाट येथे वैनगंगा नदीच्या पात्रात बुडणाऱ्या तीन युवकांना वाचविणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकात पोलीस हवालदार खोब्रागडे, पोलीस नायक उईके, बोपचे, रहांगडाले, कराडे,भांडारकर आणि जावेद पठाण यांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाची उपाय योजना फळाला
मकर संक्राती निमित्त बिरसोला संगमघाट येथे दरवर्षी योग्य काळजी न घेतल्याने दोन तीन जणांचा बुडून मृत्यु होतो. त्यामुळे अशा घटनांची पुनर्रावृत्ती यंदा होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने योग्य ती काळजी घेतली. तसेच बिरसोला संगमघाट येथे बचाव पथक चौवीस तास तैनात ठेवले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या उपाय योजनेमुळे बुधवारी वैनगंगा नदीच्या पात्रात बुडणाऱ्या तीन युवकांचे प्राण वाचविणे शक्य झाले.

Web Title: Three youths rescued by drowning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.