सरकारकडून साहित्य नाही, कुटुंबातही विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:26+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजनांचा भडीमार होत असताना विमा जाहीर करण्यापेक्षा आम्हाला वाढवून दिलेले वेतन वेळेत द्या एवढीच माफक अपेक्षा आशा, अंगणवाडी सेविकांना व्यक्त केली आहे. कोरोनाचे सावट गडद होत असताना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्या व्यक्तीला काय त्रास होत आहे. त्याची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे काम आशा, अंगणवाडी सेविका करीत आहेत.

There is no literature from the government, there is also conflict between the families | सरकारकडून साहित्य नाही, कुटुंबातही विसंवाद

सरकारकडून साहित्य नाही, कुटुंबातही विसंवाद

Next
ठळक मुद्देआशा, अंगणवाडी सेविकांचे आरोग्य धोक्यात : शासनाने घ्यावी दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : घरातून कामासाठी बाहेर पडताना घरच्यांचा राग अनावर होतो आणि बाहेर पडल्यावर कोणी धड माहिती देत नाही. कुठल्याही घरात जाऊन माहिती गोळा करावी लागते. घरी आल्यावर पुन्हा घरच्यांच्या रोखलेल्या नजरा. एवढी मरमर करून उपयोग काय ही व्यथा आहे जिल्ह्यातील आशा, अंगणवाडी सेविकांची.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजनांचा भडीमार होत असताना विमा जाहीर करण्यापेक्षा आम्हाला वाढवून दिलेले वेतन वेळेत द्या एवढीच माफक अपेक्षा आशा, अंगणवाडी सेविकांना व्यक्त केली आहे. कोरोनाचे सावट गडद होत असताना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्या व्यक्तीला काय त्रास होत आहे. त्याची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे काम आशा, अंगणवाडी सेविका करीत आहेत.
या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग, सरकार दरबारी वेगवेगळ्या योजनांची आखणी होत असताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका मोबदल्यापासून वंचित आहेत. कोरोनाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असताना त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्य पुरविल्या गेलेले नाही.
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर आशा-अंगणवाडी सेविकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. सर्वेक्षणाच्या जवाबदारीसाठी त्यांना कुठलाही प्रोत्साहनपर भत्ता दिला जात नाही. वेतन नियमित मिळेल हा शब्द नाही. केवळ आशा कार्यकर्त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे धोक्याचे काम करीत आहेत.
या कामात प्रशासनाकडून दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असताना गाव पातळीवरही काही ठिकाणी त्यांना धक्काबुक्की, अपमान सहन करावा लागतो. दुसरीकडे, घरातही वेगळेच प्रश्न, कशाला बाहेर पडतेस, पगार मिळत नाही. उगाच आजार घेऊन येशील, अशी बोलणी ऐकत घरात रहावे लागत आहे. वेतन वेळेत मिळत नसल्याने आर्थिक अडचणी समोर आहेत.
कोरोनामुळे या अडचणी वाढल्या आहेत. दिवसाला सर्वेक्षणाची असणारी सक्ती, अहवाल याचा मोबदला काहीच नाही. कुटूंबातील सदस्य वैतागले असून घरातून कामासाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे. आशा-अंगणवाडी सेविका तळागाळापर्यंत पोहचून काम करीत आहेत. मात्र शासनाचा त्यांच्याशी संवाद नाही. कुटुंब म्हणत मानधन नाही. कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत. आशा-अंगणवाडी सेविकांना किमान आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जाव्यात त्यांच्या कामासाठी प्रोत्साहनपर भत्ता देण्याची तरतूद शासनाने करावी अशी मागणी आशा, अंगणवाडी सेविकांना केली आहे.

Web Title: There is no literature from the government, there is also conflict between the families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.