परिचारिकांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:14+5:30

कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या अधिपरिचारीकांना राहण्याची व जेवणाची सोय करावी, कोविड पॉजिटीव्ह आलेल्या अधिपरिचारीकांना होम क्वारंटाईन (क्वार्टर) व सोबत जेवणाची सोय करून द्यावी, डॉक्टरांचे काम डॉक्टरांनी करावे, कोविडच्या कामात परिचारीकांची संख्या कमी असल्याने संख्या वाढविण्यात यावी, संगणक ऑपरेटरचे काम त्यांना सांगण्यात यावे ते काम परिचारीकांवर सोपवू नये, अपुऱ्या साधनांमुळे रूग्णांचा उपचार होऊ शकत नाही.

Strike of nurses | परिचारिकांचे कामबंद आंदोलन

परिचारिकांचे कामबंद आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा : अपुऱ्या सुविधांमुळेही आरोग्यावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
ुेगोंदिया : अतिरीक्त कामाचा ताण व त्यात अपुऱ्या सोयीसुविधांमुळे परिचारिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अन्य महत्वाच्या मागण्यांना घेऊन येथील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत परिचारिकांनी मंगळवारी (दि.१५) कामबंद आंदोलन केले.
कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या अधिपरिचारीकांना राहण्याची व जेवणाची सोय करावी, कोविड पॉजिटीव्ह आलेल्या अधिपरिचारीकांना होम क्वारंटाईन (क्वार्टर) व सोबत जेवणाची सोय करून द्यावी, डॉक्टरांचे काम डॉक्टरांनी करावे, कोविडच्या कामात परिचारीकांची संख्या कमी असल्याने संख्या वाढविण्यात यावी, संगणक ऑपरेटरचे काम त्यांना सांगण्यात यावे ते काम परिचारीकांवर सोपवू नये, अपुऱ्या साधनांमुळे रूग्णांचा उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईक मारण्यास धावतात त्यांच्यापासून सुरक्षिततेचा प्रश्न उदभवतो अशात सुरक्षा मिळावी अशी परिचारिकांची मागणी आहे.
विशेष म्हणजे, वैद्यकीय अधिष्ठाता पीपीई कीट घालून रूग्ण सेवा करायची नाही असे म्हणतात. अशात कोविडमध्ये काम करणाºया परिचारीकांना डॉक्टरांचा त्रास होत असल्यामुळे परिचारीकांनी मंगळवारी (दि.१५) कामबंद आंदोलन केले. यासंदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांनी वैद्यकीय महाविद्यालय गाठून अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे यांच्याशी चर्चा केली आहे.

पारिचारीका वाढविल्या शिवाय कामावर येणार नाही
महाविद्यालयात परिचारिकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण येत आहे. शिवाय अपुºया सुविधांमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. करिता परिचारिकांची पदे भरून त्यांची संख्या वाढविली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा परिचारिकांचा पवित्रा आहे.

Web Title: Strike of nurses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.