शंभर टक्के लसीकरण करून तिसरी लाट थोपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:00 AM2021-10-10T05:00:00+5:302021-10-10T05:00:17+5:30

डॉ. नितीन कापसे म्हणाले, पोलिओ लसीकरणासारखेच कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा नाही. जिल्ह्यातील ४५ टक्के नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा कोरोना लसीकरणात सहाव्या क्रमांकावर आहे. व्हॉट्सॲप नंबर ८५९१४८९२३२ या कोविन पोर्टलशी कनेक्टेड केल्याचे सांगितले. 

Stop the third wave by vaccinating one hundred percent | शंभर टक्के लसीकरण करून तिसरी लाट थोपवा

शंभर टक्के लसीकरण करून तिसरी लाट थोपवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता दर्शविली जात आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जास्तीतजास्त प्रमाणात लसीकरण करावे. शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठून तिसरी लाट थोपवा, असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सांगितले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना त्या बोलत होत्या. पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते.  
जिल्हाधिकारी नयना गुंडे म्हणाल्या, कोरोना लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचे असून सध्या जिल्ह्यातील ७७ टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतलेला आहे. 
८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ‘मिशन कवचकुंडल’ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. विभागाकडे १ हजार जम्बो सिलिंडर उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. 
अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले म्हणाले, कोरोनाची लस घेणे हे कवचकुंडल आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात यावे. लसीकरणासाठी गावनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 
कोरोना लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या अभियानात इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग यांचा सहभाग घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात जास्तीतजास्त लसीकरण केलेल्या पहिल्या तीन जिल्ह्यांत आपल्या जिल्ह्याचासुद्धा समावेश असावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोरोना लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन केले असल्याचे सांगितले. 

लसीकरणात जिल्हा सहाव्या क्रमांकावर
-डॉ. नितीन कापसे म्हणाले, पोलिओ लसीकरणासारखेच कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा नाही. जिल्ह्यातील ४५ टक्के नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा कोरोना लसीकरणात सहाव्या क्रमांकावर आहे. व्हॉट्सॲप नंबर ८५९१४८९२३२ या कोविन पोर्टलशी कनेक्टेड केल्याचे सांगितले. 
कोरोना लसीकरणासाठी व्हॉट्सॲप
-नोंदणीकरिता स्टार्टअप नवाना टेक लिमिटेड कंपनीद्वारे ॲप तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. त्याची सुरुवात गोंदिया शहरात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. आता व्हॉट्सॲपद्वारे लसीकरण नोंदणीसाठी या ॲपचा उपयोग नागरिकांना निश्चितच होणार आहे. ॲप हा मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

 

Web Title: Stop the third wave by vaccinating one hundred percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.