धान खरेदीसंदर्भातील समस्या वेळीच मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:00 AM2021-11-25T05:00:00+5:302021-11-25T05:00:34+5:30

पूर्व विदर्भात धान खरेदी करताना अभिकर्ता संस्था, तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, तूर्त कॅमेरे लावण्याची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बारदान्याचा अभाव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

Solve the problem of grain procurement in time | धान खरेदीसंदर्भातील समस्या वेळीच मार्गी लावा

धान खरेदीसंदर्भातील समस्या वेळीच मार्गी लावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घ्या. धान विहित वेळेतच खरेदी केले जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी,  शेतकऱ्यांकडून धान खरेदीदरम्यान येणाऱ्या अडचणी व समस्या संबंधित यंत्रणांनी वेळीच मार्गी लावाव्यात, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत खा. प्रफुल्ल पटेल यांनी केल्या.
पूर्व विदर्भात धान खरेदी करताना अभिकर्ता संस्था, तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, तूर्त कॅमेरे लावण्याची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बारदान्याचा अभाव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. यावर भुजबळ यांनी बारदाना पर्याप्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. 
धान खरेदी करताना बारदान्यावर टॅग लावण्याची प्रक्रिया आहे. मात्र, हे टॅग लावण्याची गरज नाही. मशीनने बारदाना शिवण करण्याचे काम गरजेचे नाही अशा सूचना यावेळी केल्या. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धानाची नासाडी झाली होती.  याबाबत उपाययोजना करून यंदा खरेदी करण्यात येणारे धान सुरक्षित राहण्याच्या अनुषंगाने कारवाई करावी असे निर्देश बैठकीत दिले. 
बैठकीला आ. मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंघला, जिल्हाधिकारी नयना गुंडे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, बाजार समितीचे लोमेश वैद्य, प्रवीण बिसेन, रेखलाल टेंभरे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

गोदामांची समस्या वेळीच दूर करा 
- धान खरेदी करणाऱ्या अभिकर्ता संस्थांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. खा. प्रफुल्ल पटेल यांनी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदी वेळेत केली जावी.  धान साठवणुकीसाठी गोदामांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी धानाच्या साठवणुकीचा प्रश्न सोडवावा शेतकऱ्यांची कोणत्याही धान केंद्रावर गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणांनी घेण्याच्या सूचना खा. प्रफुल्ल पटेल यांनी केल्या. 
 

 

Web Title: Solve the problem of grain procurement in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.