तलवारीच्या धाकावर ड्रायव्हरचा मोबाईल हिसकावून नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:00 AM2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:00:26+5:30

एका स्कूटीवर दोन ईसम आले. त्यांनी आपले वाहन मालवाहक समोर आडवे करून मालवाहक थांबविली. तसेच, दोघांनी संतकुमारच्या गळ्यावर तलवार रोखून १० हजार रुपये दे, अन्यथा तुला ठार करू, अशी धमकी दिली.  संतकुमार यांनी आपल्याकडे पैसे नाहीत, असे म्हटल्यावर आरोपींनी त्यांच्या जवळचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला व दोघेही स्कूटी घेऊन छोटा गोंदियाकडे पसार झाले.

Snatched the driver's mobile phone at the point of a sword | तलवारीच्या धाकावर ड्रायव्हरचा मोबाईल हिसकावून नेला

तलवारीच्या धाकावर ड्रायव्हरचा मोबाईल हिसकावून नेला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  लगतच्या ग्राम नागरा-कटंगी येथील वाहनचालक संतकुमार नंदकिशोर सुलाखे (२६) यांच्या गळ्यावर तलवार रोखून दोघांनी मोबाईल हिसकावून नेला होता. त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.४) करण्यात आली आहे. या प्रकणात अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून तलवार जप्त करण्यात आली आहे. 
  नागरा-कटंगी येथील संतकुमार सुलाखे  टाटा एस मालवाहक क्रमांक एमएच २१-एक्स ०२४१ वर काम करतात. शुक्रवारी (दि.३) सायंकाळी ४ वाजतादरम्यान ते गाडीत साहित्य भरून दतोरा येथे गेले होते. तेथे साहित्य सोडून करून सिव्हिल लाईन इंगळे चौकातील बोडीजवळ आले असता एका स्कूटीवर दोन ईसम आले. त्यांनी आपले वाहन मालवाहक समोर आडवे करून मालवाहक थांबविली. तसेच, दोघांनी संतकुमारच्या गळ्यावर तलवार रोखून १० हजार रुपये दे, अन्यथा तुला ठार करू, अशी धमकी दिली.
 संतकुमार यांनी आपल्याकडे पैसे नाहीत, असे म्हटल्यावर आरोपींनी त्यांच्या जवळचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला व दोघेही स्कूटी घेऊन छोटा गोंदियाकडे पसार झाले. या घटनेची तक्रार संतकुमार यांनी शनिवारी (दि. ४) करताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड व सहकाऱ्यांनी शहरात सर्च मोहीम राबवून आरोपी शैलेश प्रीतम टेंभरे (२६, रा. नवाटोला-नागरा)  व सोनू ऊर्फ गोपाल चव्हाण (३८, रा. गौशाला वॉर्ड) यांना अटक केली आहे.

 

Web Title: Snatched the driver's mobile phone at the point of a sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.