साहेब आम्हाला बारदाना उपलब्ध करुन द्या हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:16+5:30

यंदा रब्बी हंगामाचे धान विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने अद्यापही बारदाना उपलब्ध करुन दिला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेण्याची अडचण निर्माण होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना लवकर धानाची विक्री करुन खरीप हंगामपूर्व शेतीची कामे करायची आहे. मात्र अद्याप बारादान उपलब्ध करुन न दिल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे.

Sir, make us available bardana | साहेब आम्हाला बारदाना उपलब्ध करुन द्या हो

साहेब आम्हाला बारदाना उपलब्ध करुन द्या हो

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : महामंडळाचे झाले दुर्लक्ष, धान विक्रीची समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : स्थानिक ठिकाणच्या आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था येथे शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिक शासनाला विकण्यासाठी बारदानाच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यास अडचण जात आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून बारादाना उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी विकास विभागातंर्गत चालणाऱ्या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेत जवळपासच्या १३ गावातील शेतकरी सभासद आहेत. शेतकरी आपले रब्बी व खरीप हंगामाचे धान या संस्थेमार्फत शासनाला विक्र ी करतात. पण यंदा रब्बी हंगामाचे धान विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने अद्यापही बारदाना उपलब्ध करुन दिला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेण्याची अडचण निर्माण होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना लवकर धानाची विक्री करुन खरीप हंगामपूर्व शेतीची कामे करायची आहे. मात्र अद्याप बारादान उपलब्ध करुन न दिल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे. त्यातच ३० जूनपर्यंतच शासकीय धान खरेदी केंद्र सुरू राहणार असल्याने तेवढ्याच कालावधी शेतकऱ्यांना धानाची विक्री करता येणार आहे. अन्यथा खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करावी लागेल. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

महामंडळाच्या संचालकांनी द्यावे लक्ष
आदिवासी विकास महामंडळातंर्गत आदिवासी बहुल भागात हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून खरेदी प्रक्रियेकडे महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे याकडे महामंडळाच्या संचालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

महामंडळाकडून आमच्या संस्थेला बारदाना अद्यापही उपलब्ध करुन देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बारदाना देण्यात आलेला नाही. बारदाना उपलब्ध होताच तो दिला जाईल.
- एल.बी.बागडे, सचिव, आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था,बाराभाटी

बारदाना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. महामंडळाच्या संचालक व विभागीय व्यवस्थापक यांच्याशी बोलणे झाले आहे. येत्या दोन तीन दिवसात शेतकऱ्यांना बारदाना उपलब्ध होईल.
- राहुल पाटील, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, नवेगावबांध

Web Title: Sir, make us available bardana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.