एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे; कोरोना काळात झाले ज्येष्ठांचे झाले हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 05:00 AM2021-07-29T05:00:00+5:302021-07-29T05:00:07+5:30

गोंदिया जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाचे २ लाख ५० हजार लाेक आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण १६ पोलीस ठाणे असून १२८ पोलीस अधिकारी, तर २२१० पोलीस कर्मचारी आहेत. परंतु या पोलिसांनी घरात एकटे राहणाऱ्या वृध्दांकडे कोरोनाच्या काळात ढुंकूनसुध्दा पाहिले नाही. काेणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती एकटे वृध्द राहतात याची माहिती पोलिसांकडे  उपलब्धच नाही.

The security of the elderly living alone is assured; What happened to the elders during the Corona period! | एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे; कोरोना काळात झाले ज्येष्ठांचे झाले हाल!

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे; कोरोना काळात झाले ज्येष्ठांचे झाले हाल!

Next
ठळक मुद्देकाळजी घेणारी यंत्रणाच निरस, व्यथा मांडणार कुठे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या काळात सरकारने लॉकडाऊन केले, परंतु योग्य नियोजन न केल्यामुळे घरात एकटे राहणाऱ्या वृध्दांची फार गैरसोय झाली. हातात पैसा नाही, दुकाने सुरू नाहीत, मिळेल त्या जीवनावश्यक वस्तू दुपटीच्या भावात अशात जीवन जगणे त्यांना कठीण झाले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कुणी नातेवाईक भेटायला आले नाही. पोलिसांनीही साधा फेरफटका मारला नाही. पोलीस गल्लीतून फिरले तर आपली समस्या कुणाला सांगणार या हेतूने वृध्द लोक मुकाट्याने त्रास सहन करीत घरातच राहिले. 
गोंदिया जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक वयाचे २ लाख ५० हजार लाेक आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण १६ पोलीस ठाणे असून १२८ पोलीस अधिकारी, तर २२१० पोलीस कर्मचारी आहेत. परंतु या पोलिसांनी घरात एकटे राहणाऱ्या वृध्दांकडे कोरोनाच्या काळात ढुंकूनसुध्दा पाहिले नाही. काेणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती एकटे वृध्द राहतात याची माहिती पोलिसांकडे  उपलब्धच नाही. लोकसंख्येच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात पोलिसांचीही कमतरता आहे.  कोरोनाच्या काळात फ्रंट  वर्कर म्हणून  काम  करणाऱ्या पोलिसांवर कामाचा ताण असल्यामुळे त्यांना वृध्दांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही.  पाेलिसांपेक्षा शहरातील काही सामाजिक संस्थांनी ज्येष्ठांना मदत करण्याचे काम केले. 

औषध आणण्यासाठी सोय नाही
- उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार घेऊन जगणाऱ्या वृध्दांना औषधापासून वंचित राहावे लागले. कधी मोहल्लातील लोक औषध आणून देत होते, तर कधी घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याने औषध कसे आणायचे हा प्रश्न पडला. कोरोनाच्या कालावधीत याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला. 

एकटे राहणाऱ्या वृध्दांची संख्या नाेंदच नाही

आमगाव पोलीस ठाणे
६० वर्षांवरील लोकांची संख्या किती हा रेकार्ड आमच्याकडे राहात नाही. गरजवंताला आम्ही मदत करतो. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करतो.

गोंदिया शहर पोलीस ठाणे
कोरोनाच्या काळात प्रत्येक पोलीस कामात व्यस्त होता.  ज्याला मदतीची गरज आहे त्यांना मदत पोलिसांनी केली. परंतु एकटे कोण घरी आहे याची कल्पना पोलिसांना नव्हती.

रामगर पोलीस ठाणे
कोरोनाच्या काळात रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे यावर पोलीस बंदोबस्त करीत होती. ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांनी मदतीची हाक मारली त्यांच्या मदतीसाठी पोलीस धावून गेले, परंतु ६० वर्षांवरील कोण व्यक्ती एकटे आहेत. कुणाला मदतीची गरज आहे हे पोलिसांना कसे कळणार? मदत मागतील तेव्हाच मदत करता येईल.

आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही

आपण जीवन जगत असताना पोलिसांनी आपल्याला मदतीची गरज आहे का, असे कधीच विचारणा केली नाही. आपल्या जीवनातील कष्ट आपणच भोगत आहे.
- शकुंतलाबाई पंधरवार, 
पदमपूर

आयुष्याची ६५ वर्षे ओलांडली असताना आता एकाकी जीवन जगत आहे. परंतु मदत करण्यासाठी आतापर्यंत कुणी पाेलीस किंवा जिल्हा प्रशासन पुढे आले नाही. आपल्याला जमेल तेवढा खटाटोप करून जीवन जगण्याचे धाडस करते. 
- कामनबाई मौजे, पोवारीटोला

 

Web Title: The security of the elderly living alone is assured; What happened to the elders during the Corona period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.