४९रुपयांच्या मास्कची थेट ८० रुपयांत ग्राहकांना विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 05:00 AM2020-10-31T05:00:00+5:302020-10-31T05:00:09+5:30

शहरातील दुर्गा चौक परिसरातील तीन मेडिकलमध्ये एन ९५ आणि तीन पदरी आणि दोन पदरी मास्कच्या दराची लोकमत चमूने शुक्रवारी चाचपणी केली. असता एन ९५ मास्कचे दर ८० ते १०० रुपयांपर्यंत होते. तर तीन पदरी मास्क १० रुपयांना विक्री केले जात होते. दोन पदरी मास्क उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शासन निर्णया संदर्भात विक्रेत्यांना विचारले असता अन्न औषध विभागाचे पत्र मिळाले असल्याचे सांगितले.

Sale of Rs 49 mask directly to customers for Rs 80 | ४९रुपयांच्या मास्कची थेट ८० रुपयांत ग्राहकांना विक्री

४९रुपयांच्या मास्कची थेट ८० रुपयांत ग्राहकांना विक्री

Next
ठळक मुद्देशासनाचे निर्देश धाब्यावर : दरपत्रक लावण्याचा विसर, शासकीय दरानुसार विक्रीच नाही, ग्राहकांची दिशाभूल

अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर हे महत्वाचे शस्त्र ठरले आहेत. या वस्तूंचा काळाबाजार होवू नये यासाठी शासनाने मास्क विक्रीचे दर निश्चित करुन दिले आहे. या संबंधिचा जीआर सुध्दा २० ऑक्टोबरला काढण्यात आला. एन ९५ मास्कचे दर १९ ते ४९ रुपये निश्चित करण्यात आले. तसेच या दराने मास्कची विक्री करण्याचे निर्देश सर्व मेडिकल विक्रेत्यांना देण्यात आले. मात्र गोंदिया शहरात ४९ रुपयांच्या एन ९५ मास्कची विक्री ८० रुपयांना आणि तीन पदरी ४ रुपयांच्या मास्कची १० रुपयांना विक्री केली जात आहे. लोकमतने शहरातील काही मेडिकलला भेट देवून चाचपणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

४९ रुपयांचा मास्क ८० रुपयात..
शहरातील दुर्गा चौक परिसरातील तीन मेडिकलमध्ये एन ९५ आणि तीन पदरी आणि दोन पदरी मास्कच्या दराची लोकमत चमूने शुक्रवारी चाचपणी केली. असता एन ९५ मास्कचे दर ८० ते १०० रुपयांपर्यंत होते. तर तीन पदरी मास्क १० रुपयांना विक्री केले जात होते. दोन पदरी मास्क उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शासन निर्णया संदर्भात विक्रेत्यांना विचारले असता अन्न औषध विभागाचे पत्र मिळाले असल्याचे सांगितले.

तीन पदरी मास्क १० रुपयांच्यावर
गोरेलाल चौक परिसरातील दोन मेडिकलमध्ये एन ९५ आणि तीन व पदरी मास्कच्या दराची चाचपणी केली असता विक्रेत्यांनी एन ९५ मास्क ८० ते १०० रुपये तर तीन पदरी मास्कचे दर १० रुपये असल्याचे सांगितले. दोन पदरी मास्क उपलब्ध नसल्याचे सांगितले. तर एका विक्रेत्यांने सध्या मास्कचे दर कमी होत असल्याने विक्री केली जात नसल्याचे सांगितले. तर दुकानसमोर मास्क विक्रीचे दरपत्रक सुध्दा लावण्यात आले नव्हते.

त्या विक्रेत्यांवर कारवाई करणार
शहर आणि जिल्ह्यातील सर्व मेडिकल विक्रेत्यांना शासकीय दरानुसार मास्कची विक्री करण्याचे पत्र दिले आहे. मात्र यानंतरही शासकीय दरानुसार मास्कची विक्री न करणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांवर शनिवारपासून (दि.३१) थेट कारवाई करण्यात येईल.
- प्रशांत रामटेके, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

ग्राहक ही अनभिज्ञ....
शासनाने मास्क विक्रीचे दर निश्चित करुन दिले आहे. पण याची माहिती ग्राहकांनाच नसल्याचा अनुभव नेहरु प्रतिमा चौकातील एका मेडिकलमध्ये आला. या मेडिकलमध्ये ९५ मास्क ८० रुपये तर तीन पदरी मास्कची १० रुपयांना विक्री केली जात होती. मात्र ग्राहकांनी सुध्दा कमी झालेल्या दराबाबत विचारणा केली नाही. त्यामुळे मेडिकल विक्रेते सुध्दा पूर्वीच्याच दराने मास्कची विक्री करीत असल्याचीे बाब पुढे आली.

Web Title: Sale of Rs 49 mask directly to customers for Rs 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.