सीएए विरोधात तिरोड्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:24+5:30

सीएए, एनआरसी विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यातंर्गत बहुजन क्रांतीच्या नेतृत्त्वात शहरात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जुनी नगर परिषदेजवळ पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर मान्यवरांची मोर्चाला संबोधित केले.

Riot march against CAA | सीएए विरोधात तिरोड्यात मोर्चा

सीएए विरोधात तिरोड्यात मोर्चा

Next
ठळक मुद्देगोंदियात बंदला संमिश्र प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए, एनआरसी व एनपीए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२९) उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सीएए, एनआरसी विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यातंर्गत बहुजन क्रांतीच्या नेतृत्त्वात शहरात मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा जुनी नगर परिषदेजवळ पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर मान्यवरांची मोर्चाला संबोधित केले.
संविधानाचे प्रास्ताविक व राष्ट्रगीताने मोर्चाचे समारोप करण्यात आला. माजी आमदार दिलीप बन्सोड, अ‍ॅड.नरेश शेंडे, मोहम्मद भाई, शिममभाई, सलिमभाई व नागरिक उपस्थित होते.

गोंदियात बंदला संमिश्र प्रतिसाद
गोंदिया: बहुजन क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२९) राष्ट्रव्यापी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. गोंदियात समिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या मुख्य बाजार परिसरात बंदचा प्रभाव नव्हता. शहराच्या इतर भागातील दुकाने मात्र दुपारपर्यंतच बंद होती. बहुजन क्रांती मोर्चाने सीएए,एनपीए व एनआरसीच्या विरोधात २९ जानेवारीला भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. गोंदियात अनेक संघटनांनी एकत्र येऊन बंदचे आवाहन केले होते. आंदोलनकर्त्यांनी सकाळी शहराचे भ्रमण करून व्यावसायीकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. रामनगर, रेलटोली, मरारटोली, कुडवा नाका, वाजपेई चौक परिसरात काही दुकाने बंद होती. शहराच्या मुख्य बाजार परिसरात बंदचा प्रभाव नव्हता. नेहरू चौक, जयस्तंभ चौक परिसरात काही दुकाने बंद होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळपासून आंदोलनकर्ते उपस्थित झाले होते. या वेळी अनेक वक्तांनी सीएए, एनपीए व एनआरसी यावर मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश खोब्रागडे, विरेंद्र जायस्वाल, छप्पर बंद आंदोलनाचे छन्नूभाई, बसपा कार्यकर्ता सुनील भरणे, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक जुबेर खान यांनी या आंदोलनाचे प्रास्तविक मांडले. बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: Riot march against CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.