येत्या रविवारपासून सुरू होतोय नवतपा; काळजी घेण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:07 PM2020-05-20T14:07:42+5:302020-05-20T14:08:02+5:30

येत्या रविवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असून कोरोनापासून सुरक्षेसाठी उपाययोजना करीत असतानाच आता नवतपापासून स्वत:चे आरोग्य सांभाळा असा सल्ला गोंदिया जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकु मंडल यांनी दिला आहे.

Navatpa starting from next Sunday; Instructions for care | येत्या रविवारपासून सुरू होतोय नवतपा; काळजी घेण्याच्या सूचना

येत्या रविवारपासून सुरू होतोय नवतपा; काळजी घेण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देनऊ दिवस उन्हाचा कहर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: येत्या रविवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असून कोरोनापासून सुरक्षेसाठी उपाययोजना करीत असतानाच आता नवतपापासून स्वत:चे आरोग्य सांभाळा असा सल्ला गोंदिया जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकु मंडल यांनी दिला आहे.
येत्या २५ तारखेपासून रोहिणी नक्षत्राची सुरूवात होत असून या नक्षत्रामध्ये सतत ९ दिवस सूर्यदेव आग ओकत असल्याने त्याला नवतपा या नावाने संबोधले जाते. या नवतपामध्ये शरीरातील उष्णतामान वाढून उष्माघाताचे नवे संकट निर्माण होऊ शकते. या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. उष्माघात हा आजार कोणालाही होवू शकतो. मानवी शरीराचे समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, शारिरीक कमजोरी वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडपणा वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खूप तहान लागणे, उलट्या होणे इत्यादी उष्माघाताची ही लक्षणे असून वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.
तत्पूर्वी अशा रूग्णाला थंड ठिकाणी किंवा सावलीच्या जागेत हलवावे, डोके व पाठीचा भाग समांतरपेक्षा थोड्या उंचावर ठेवावा. डोक्यावर थंडगार पाण्याच्या पट्या किंवा बर्फ ठेवावे. थोड्या-थोड्या अंतराने थंड पाणी पाजावे. या दरम्यान कसल्याही प्रकारचे गरम पदार्थ रूग्णाला देवू नये.रूग्णाच्या संपुर्ण शरीरावर थंड पाण्याचे कापड बांधावे असे डॉ. मंडल यांनी सांगीतले. उष्माघात टाळण्यासाठी शेतकरी किंवा शेतमजुरांनी सकाळी किंवा सायंकाळी शेतीची कामे करावी. भर उन्हात कोणतीही कामे करू नये. डोक्यावर दुपट्टा किंवा टोपी वापरावी. उष्माघात वयोवृद्ध, लठ्ठपणा, मधुमेह व आजार असणाऱ्यांना होण्याची दाट शक्यता असते. जागतिक महामारी कोरोना विषाणुच्या संकटाचा यशस्वी सामना करतानाच उष्माघाताचाही सामना करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने नवतपामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे डॉ. मंडल यांनी सांगितले.

Web Title: Navatpa starting from next Sunday; Instructions for care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.