नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून खुलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:02+5:30

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे.

Nagzira Sanctuary will open from November 1 | नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून खुलणार

नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून खुलणार

googlenewsNext
ठळक मुद्देवन्यप्रेमींसाठी आली ह्यगूड न्यूजह्ण : शासनाच्या अटी-शर्तींचे पालन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेले तालुक्यातील नागझिरा अभयारण्य १ नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीपासून आसुसलेल्या पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक रहावे लागले. मात्र त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे.
संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही होतो. फार वर्षापुर्वी या जंगलात हत्तीचे वास्तव्य होते. पाण्याचे झरेसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने या अभयारण्याला नागझिरा असे नाव पडले. या अभयारण्यात अनेक पशुपक्षी व झाडे बघायला मिळतात. हे अभयारण्य गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या मधोमध असून १५२.८१ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे यामध्ये वीज पुरवठा अजिबात नाही.
हे जंगल नैसर्गिकच राखलेले आहे. यात २०० पक्ष्यांची नोंद असून वाघ, बिबट्या, रानडुकर, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, चौसिंगा, नीलगाय, चितळ, सांभर असे असंख्य पशु आहेत. सर्पगरुड, मत्स्यगरुड, टकाचोर, नवरंग, कोतवाल, खाटीक, राखीधनेरा आदि अनेक पक्षी अभयारण्यात उडताना दिसतात.
अभयारण्यात प्रवेश करताच सांबर, चितळ, हरिण, निलगाय, रानगवा, अस्वल आदि प्राणी रस्त्याच्या दुतर्फा मुक्तपणे संचार करताना दिसतात. आजूबाजूला माकडे फांद्यावर उडया मारत असताना पर्यटकांचे मन मोहून टाकतात.
पावलापावलावर दिसणारी हरणे, माकडे त्याचप्रमाणे राज्यपक्षी हरियाल, हळद्या, निलपंखी, स्वर्गीयनर्तक, नवरंगी, तुरेवाला, सर्प गरुड, व्हाईट आईड बझार्ट यासारखे शिकारी पक्षी बघायला मिळतात. अनेक प्रकारची फुलपाखरे निरनिराळ्या प्रकारची कोळी, पट्टेवाला वाघ, अस्वले, रानकुत्रे अभयारण्यात आहेत.
पर्यटकांनी असे जावे
या अभयारण्याच्या आसपास आवर्जुन भेट द्यावी, असे नवीन नागझिरा, नवेगावबांध जलाशय, चोरखमारा जलाशय, अंधारबन, नागदेव पहाडी, कोसमतोंडी त्याचप्रमाणे काही अंतरावर कान्हा प्रकल्प, पेंच प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा दुवा आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथून २२ किलोमीटर पिटेझरी गेटवरुन या अभयारण्यात प्रवेश करता येतो. तिरोडा येथून १२ किलोमीटर अंतरावरुन या अभयारण्यात प्रवेश करता येते.
या आहेत आटी-शर्ती
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश दिला जाणार आहे, १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पयर्यटनाकरिता प्रवेश दिला जाणार नाही, सर्व पर्यटक, गाईड व वाहन चालक यांना मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे, तसेच वाहनात बसण्यापूर्वी सॅनिटायझरने हात निर्जंतूक करणे आवश्यक राहील, वनक्षेत्रात मास्क, हातमोजे, पाणी बाटल व फेकणे जाणार याची दक्षता घ्यावी लागेल, प्रवेशद्वारावर शारीरिक अंतराचे पालन करावे लागेल यासह अन्य आटींचे पालन करावे लागणार आहे.

Web Title: Nagzira Sanctuary will open from November 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.