Maharashtra Election 2019 ; निवडणुकीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:08+5:30

ऑक्टोबर २०१९ या महिन्याचे वेतन, भत्याचे आणि निवृत्ती वेतन २४ ऑक्टोबर २०१९ पूर्वी करण्यात यावे. वेतन निवृत्तीवेतन प्रदानाची तारीख लक्षात घेऊन संचालक, संचालनालय लेखा व कोषागारे यांनी वेतन निवृत्तीवेतन देयकांच्या कारवाईचे नियमित वेळापत्रक त्यानुरुप अलिकडेच आणण्याची कारवाई करण्याचे शासन निर्णय काढण्यात आला.

Maharashtra Election 2019 ; Diwali workers in the state dark because of the elections | Maharashtra Election 2019 ; निवडणुकीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचारी राहणार वेतनापासून वंचित : कोषागार कार्यालय म्हणतो, निवडणुकीमुळे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीसाठी देण्यात यावे, असे पत्र ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनानचे उपसचिव इंद्रजित गोरे यांनी काढले. परंतु निवडणुकीच्या कामात कर्मचारी अधिकारी व्यस्त असल्याचे सांगून राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन २४ ऑक्टोबरपूर्वी देता येणार नाही असे पत्र ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे लेखा व कोषागार संचालक ज.र.मेनन यांनी काढले आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे.
दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी २५ ऑक्टोबर २०१९ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करता यावा याकरिता आॅक्टोबर २०१९ चे नोव्हेबर २०१९ मध्ये देय होणारे वेतन,निवृत्तीवेतन २४ ऑक्टोबर २०१९ पूर्वी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. ऑक्टोबर २०१९ या महिन्याचे वेतन, भत्याचे आणि निवृत्ती वेतन २४ ऑक्टोबर २०१९ पूर्वी करण्यात यावे. वेतन निवृत्तीवेतन प्रदानाची तारीख लक्षात घेऊन संचालक, संचालनालय लेखा व कोषागारे यांनी वेतन निवृत्तीवेतन देयकांच्या कारवाईचे नियमित वेळापत्रक त्यानुरुप अलिकडेच आणण्याची कारवाई करण्याचे शासन निर्णय काढण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिले जाणार होते.त्यासंदर्भात संचालक संचालनालय लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय,राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना कळविण्यात आले होते.दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी, निवृत्तीवेतन धारकांना दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करता यावा, याकरिता ऑक्टोबरचे नोव्हेबरमध्ये देय होणारे वेतन, निवृत्तीवेतन २४ ऑक्टोबर २०१९ पूर्वी प्रदान करण्याचे आदेश दिले.वेतनासाठी पैसे नसतील तरी उणे देयके काढण्यासंदर्भात सूचविण्यात आले होते.
वित्त विभागाने शासन परिपत्रक काढून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर आहरण व सवितरण अधिकारी स्तरावर उणे देयक प्राधिकारपत्र काढण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.
सदर परिपत्रकान्वये महाराष्ट्र कोषागार नियम १९६८, नियम क्र.१५३ (१०) नुसार, सहायक अनुदान (वेतन), गुप्त सेवांवरील खर्च, नैसर्गिक आपत्ती इत्यादीवर येणाºया अतिरिक्त खर्चाची देयके उणे प्राधिकार पत्राद्वारे काढण्याची मुभा दिली आहे. तसेच अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरील नियमावली अन्वये, ३६-सहायक अनुदान (वेतन) या उद्दिष्टाखाली अमर्यादित उणे रकमेच्या देयकांची प्राधिकारणचे काढण्याची सुविधा दिली आहे. सदर ३६-सहायक अनुदान (वेतन) या उद्दिष्टाखाली पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करुन देण्याची सुविधा नसल्याने फक्त अनिवार्य खर्चाखालील ३६-सहायक अनुदान (वेतन) या उद्दिष्टाखाली ऑक्टोबर २०१९ पर्यंत नियमित वेतनासाठी कमी पडणाºया रकमेची देयके खालील अटींच्या अधीन राहून उणे प्राधिकार पत्राद्वारे काढण्यात परवानगी देण्यात आली होती. परंतु दिवाळी सणाची सुरुवात २५ पासून होत असल्याने आता निवडणुकीचेही काम सुरू असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांचे ऑक्टोबर २०१९ या महिन्याचे वेतन काढणे शक्य होणार नाही,असे पत्र महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे लेखा व कोषागारे संचालक ज.र.मेनन यांनी ११ ऑक्टोबरला काढले. त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचाºयांची यंदा दिवाळी अंधारात जाणार आहे.

वेतन देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
निवडणुकीच्या कामात प्रत्येक विभागाचे कर्मचारी लागले आहेत. आपापल्या विभागाचे काम करूनही निवडणुकीचे काम प्रामाणीकपणे केल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी वित्त विभागाने नियोजन करावे.कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे यांनी केली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Diwali workers in the state dark because of the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.