महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर चकमक; सात नक्षली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:08 PM2019-08-03T12:08:00+5:302019-08-03T12:08:27+5:30

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव या महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून तीत सात नक्षलवादी ठार झाले.

On Maharashtra-Chhattisgarh border Seven Naxals killed | महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर चकमक; सात नक्षली ठार

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर चकमक; सात नक्षली ठार

Next
ठळक मुद्देबोरतलाव सीमेवरील चकमक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव या महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून तीत सात नक्षलवादी ठार झाले. ही घटना शनिवारी पहाटे घडली.
या भागातून नक्षली जात असल्याची खबर छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस व सीएएफची पार्टी रवाना झाली. नक्षली व पोलिसांदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर सात नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत ए.के. ४७, ३०३ रायफल, १२ बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री ताब्यात घेतली. या चकमकीत तीन पोलिस जवान जखमी झाले आहेत.

Web Title: On Maharashtra-Chhattisgarh border Seven Naxals killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.