प्रभूरोड बनले डंम्पिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 05:00 AM2020-03-16T05:00:00+5:302020-03-16T05:00:01+5:30

रेल्वेस्थानक जवळच्या प्रभू रोडवरील दृश्य पाहून नगर पालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत ‘कोरोना’ची बाधा तर झाली ना? असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहणार नाही. वर्दळीच्या या रस्त्यावर दारूच्या बॉटल्स, पाणी पाऊचचा सडा पडला असून, सारा परिसर दुर्गंधीने नटल्याचे बघितल्यानंतर ‘हे प्रभू’ म्हणण्याची वेळ आली आहे.

Lord Road became a dumping yard | प्रभूरोड बनले डंम्पिंग यार्ड

प्रभूरोड बनले डंम्पिंग यार्ड

Next
ठळक मुद्दे‘हे प्रभू’ म्हणण्याची वेळ : नगर परिषदेचे स्वच्छतेकडे सपशेल दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परदेशातून विदर्भाच्या भूमीत पाय ठेवलेल्या कोरोनाची दहशत सध्या शहरासह जिल्ह्यात आहे. स्वच्छता हाच रामबाण उपाय, असेही प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु, प्रशासनाचाच एक भाग असलेल्या नगर पालिकेला स्वच्छतेचा विसर पडला आहे. रेल्वेस्थानक जवळच्या प्रभू रोडवरील दृश्य पाहून नगर पालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत ‘कोरोना’ची बाधा तर झाली ना? असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहणार नाही. वर्दळीच्या या रस्त्यावर दारूच्या बॉटल्स, पाणी पाऊचचा सडा पडला असून, सारा परिसर दुर्गंधीने नटल्याचे बघितल्यानंतर ‘हे प्रभू’ म्हणण्याची वेळ आली आहे.
व्यापार नगरी म्हणून गोंदिया शहराची ओळख आहे. या शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांचा डेरा आहे. मोठमोठे व्यापारी प्रतिष्ठान आहेत. शिवाय दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक देखील आहे. रेल्वेची सुविधा असल्याने नागपूर आणि रायपूर या दोन्ही बाजूने आवागमन करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. कोणी कामानिमित्त तर कोणी नोकरीनिमित्त शहरात पाय ठेवतो. त्यामुळेच की काय, रेल्वे स्थानकाजवळच्या प्रभूरोडवर मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, खानावळ, बँकसह अन्य कार्यालये वसली आहेत. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी ‘शॉर्टकट’ म्हणून प्रभू रोडने अधिक आवागमन करतात. परंतु, या वर्दळीच्या ठिकाणाकडे स्वच्छतेच्या बाबतीत नगर परिषदेचे लक्ष गेले नाही.
गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यावर घाण पसरली आहे. दारूच्या बॉटल्स, पाणी पाऊचचा सडा पडलेला आहे. कित्येक दिवस हा कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधीने कळस गाठला आहे. नाकावर रु माल मांडूनच प्रवाशांसह अन्य सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना आवागमन करावे लागते. उल्लेखनीय म्हणजे, या परिसरात आजबाजूला मुतारीची कोणतीही सोय नाही. त्यामुळे ऐन रस्त्यावर उघड्यावर लघूशंका करण्याचे प्रमाणही वाढले आहे. डुकरांचा हैदोस हा नेहमीचाच झाला आहे. दरम्यान, स्वच्छतेचा ढिंढोरा पिपटणाºया नगर पालिकेने कोरोनाने गोंदिया शहरात पाय रोवूच नये, म्हणून या परिसरात ताबडतोब स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नेहमीच दारूड्यांचा घोळका
रेल्वेस्थानक परिसरात म्हणजेच, या रस्त्यावर देशी-विदेशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे दिवसाढवळ््या नशेत तर्रर्र राहणाºयांची संख्याही कमी नाही. रात्रीला मात्र, दारूड्यांचा घोळका येथे हमखास पाहायला मिळतो. हातात बाटल घेऊन कित्येकांना बघता येते. नशेत असताना त्यांच्यातील अश्लिल हावभाव आवागमन करणाºया महिला-मुलींना शरमेने मान खाली घालण्यास भाग पाडते.

Web Title: Lord Road became a dumping yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.