सर्वसामान्यांचा प्रवास झाला सुखाचा ! २३ रेल्वेगाड्या झाल्या स्पेशल काढून नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:00 AM2021-11-19T05:00:00+5:302021-11-19T05:00:25+5:30

तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आता रेल्वेने विशेष गाड्यांचा दर्जा काढत या गाड्या नियमितपणे सुरू केल्या आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज ५६ गाड्या धावत होत्या. यापैकी २३ गाड्यांचा विशेषचा दर्जा हटला असून या गाड्या आता नियमित झाल्या आहेत. तर गोंदिया-बालाघाट, गोंदिया-समनापूर, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-दुर्ग, गोंदिया-इतवारी या लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. 

The journey of the common people was a happy one! Regular removal of 23 special trains | सर्वसामान्यांचा प्रवास झाला सुखाचा ! २३ रेल्वेगाड्या झाल्या स्पेशल काढून नियमित

सर्वसामान्यांचा प्रवास झाला सुखाचा ! २३ रेल्वेगाड्या झाल्या स्पेशल काढून नियमित

Next

अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर रेल्वे नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देत केवळ त्याच मोजक्या गाड्या सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना दुप्पट तिकीट भाडे माेजावे लागत होते. तर लोकल आणि पँसेजर गाड्या बंद असल्याने सर्वसामान्य आणि गोरगरिबांची चांगलीच अडचण झाली होती. तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आता रेल्वेने विशेष गाड्यांचा दर्जा काढत या गाड्या नियमितपणे सुरू केल्या आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज ५६ गाड्या धावत होत्या. यापैकी २३ गाड्यांचा विशेषचा दर्जा हटला असून या गाड्या आता नियमित झाल्या आहेत. तर गोंदिया-बालाघाट, गोंदिया-समनापूर, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-दुर्ग, गोंदिया-इतवारी या लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. 
नियमित झाल्या २३ रेल्वे गाड्या 
- हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. सध्या या रेल्वे स्थानकावर ५६ गाड्या धावत आहेत. यात विशेष गाड्याचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर आता यापैकी अर्ध्या गाड्या नियमित झाल्या असून पुढील आठवड्यात पूर्णच गाड्या पूर्ववत नियमित होणार असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुढील आठवड्यात होणार सर्वच गाड्या पूर्ववत
- लॉकडाऊनपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावरून दीडशे गाड्या धावत होत्या. त्यानंतर आता ५६ विशेष गाड्या धावत आहे. या सर्व गाड्या आता नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत २३ गाड्या नियमित झाल्या असून उर्वरित सर्वच गाड्या पुढील आठवड्यापर्यंत नियमित होणार असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

पॅसेंजर गाड्या आल्या रुळावर 
गोंदिया-बालाघाट, 
गोंदिया-समनापूर, 
गोंदिया-कटंगी, 
गोंदिया-बल्लारशा, 
गोंदिया-दुर्ग, 
गोंदिया-इतवारी
गोंदिया-डोंगरगड

रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार आता विशेष गाड्यांना पूर्ववत नियमित करण्याचे काम सुरू आहे. नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देताना त्या गाड्यांच्या क्रमांकापुढे शून्य लावण्यात आला होता. आता तो शून्य काढून या गाड्यांना नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील चार-पाच दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे.        -जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

 

Web Title: The journey of the common people was a happy one! Regular removal of 23 special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे