बोरकन्हार येथे प्रत्येक विहीर व बोअरवेलवर ‘हॅन्डवॉश’ स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:20+5:30

आमगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरकन्हार या गावची लोकसंख्या २ हजार ३३९ आहे. या गावाची कुटुंबसंख्या ५७७ आहे. या कुटुंबानी साबणाने स्वच्छ हात धुवावेत यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन साबण वाटप करण्यात आले. अख्या गावातील कुटुंबांना १२०० साबण वाटप करण्यात आले. सोबतच गावातील ११ विहिरीवर व १५ बोअरवेलवर हॅन्डवॉश स्टेशन उभारण्यात आले आहे.

 Handwash station on every well and bore well at Borkhanhar | बोरकन्हार येथे प्रत्येक विहीर व बोअरवेलवर ‘हॅन्डवॉश’ स्टेशन

बोरकन्हार येथे प्रत्येक विहीर व बोअरवेलवर ‘हॅन्डवॉश’ स्टेशन

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न : ६०० कुटुंबाना प्रत्येकी दोन साबणांचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील ग्रामपंचायतकडून प्रत्येक पाण्याच्या स्त्रोताजवळ ‘हॅन्डवॉश’ स्टेशन उभारण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाने साबणाने स्वच्छ हात वारंवार धुवावेत यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन डेटॉल साबण वाटप करण्यात आले.
आमगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरकन्हार या गावची लोकसंख्या २ हजार ३३९ आहे. या गावाची कुटुंबसंख्या ५७७ आहे. या कुटुंबानी साबणाने स्वच्छ हात धुवावेत यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन साबण वाटप करण्यात आले. अख्या गावातील कुटुंबांना १२०० साबण वाटप करण्यात आले. सोबतच गावातील ११ विहिरीवर व १५ बोअरवेलवर हॅन्डवॉश स्टेशन उभारण्यात आले आहे. त्या पाण्याच्या स्त्रोताजवळ येणाºया महिलांनी आधी साबणाने स्वच्छ हात धुवावेत त्यानंतर पाणी काढावे यासाठी हे हॅन्डवॉश स्टेशन उभारण्यात आले आहे. प्रत्येक पाण्याच्या स्त्रोताजवळ साबनाची व्यवस्था ग्रामपंचायतकडून करण्यात आली. तसेच सरपंच भोजराज ब्राम्हणकर, ग्रामसेवक रितेश शहारे, उपसरपंच शैलेशकुमार मेश्राम, सदस्य मोरेश्वर फुंडे, सुखदेव हुकरे, राजाराम टेकाम, सुनिता बोपचे, रेखा पुंगळे, माया रहांगडाले, पुष्पलता भलावी, प्रमिला तुरकर यांनी गावकऱ्यांमध्ये कोरोनापासून बचाव कसा कारावा यासंदर्भात जनजागृती केली. या गावाला खंडविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी भेट दिली. गावकºयांना शुध्द पाणी कसे मिळेल, स्वच्छता कशी राखली जाईल यावर कृती करून जनजागृती करण्यात आली. राज्यमार्गावर असलेल्या बोरकन्हारमध्ये एका ट्रक चालकाचे वाहकासोबत वाद झाल्याने त्या वाहकाला बोरकन्हार येथे सोडून चालक निघून गेला होता. त्या वाहकाच्या जेवनाची व्यवस्था देखील गावकºयांनी केली. पोलिसांच्या मदतीने चालकाला बोलावून त्या वाहकाला त्याच्या चालकासोबत त्याच्या गावाला पाठविण्यात आले.

Web Title:  Handwash station on every well and bore well at Borkhanhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.