ब्लूटूथ लावून टीईटीचा पेपर सोडविणारी 'ती' मुलगी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 03:25 PM2021-11-22T15:25:49+5:302021-11-22T15:37:39+5:30

जिल्ह्यातील ३० केंद्रांवरून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा घेण्यात आली. गोंदिया अंतर्गत पहिल्या पेपरसाठी बसलेल्या एका परीक्षार्थी मुलीने चक्क ब्लूटूथ लाऊन पेपर दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिला निलंबित करण्यात आले आहे.

girl student suspended for cheating in TET exam by using Bluetooth | ब्लूटूथ लावून टीईटीचा पेपर सोडविणारी 'ती' मुलगी निलंबित

ब्लूटूथ लावून टीईटीचा पेपर सोडविणारी 'ती' मुलगी निलंबित

Next
ठळक मुद्देब्लूटूथ जप्त करून पुण्याला पाठविले ६७३९ विद्यार्थ्यांनी दिली टीईटी परीक्षा

गोंदिया : जिल्ह्यातील ३० केंद्रांवरून टीईटीची परीक्षा रविवारी (दि.२१) घेण्यात आली. टीईटीचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते १ वाजता दरम्यान होता. येथील संत तुकाराम हायस्कूल या केंद्रावर पेपर देणाऱ्या एका विद्यार्थिनीने चक्क ब्लूटूथ लाऊन पेपर सोडविला. त्या ब्लूटूथवरून इतर परीक्षार्थ्यांनी गोंधळ घातल्यामुळे त्या मुलीला निलंबित करण्यात आले. व तिच्या जवळील ब्लूटूथ जप्त करून ताे पेपरसह पुण्याला पाठविण्यात आला आहे.

संपूर्ण पेपर होईपर्यंत हा प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही. पेपर सुटल्यावर बाहेर पडताना तिने ब्लूटूथ काढल्याने हा प्रकार उघडकीस आला. यावर सोबत असलेल्या परीक्षार्थ्यांनी तिचा पेपर रद्द करावा म्हणून गोंधळ घातला. या परीक्षेतून तिला निलंबित करण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी डी. एम. मालाधरी यांनी दिली आहे.

टीईटीच्या ७५९१ विद्यार्थ्यांपैकी ६७३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यात पहिल्या पेपरसाठी ४६२९ विद्यार्थ्यांपैकी ४१०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. द्वितीय पेपर २९६२ विद्यार्थ्यांपैकी २६३९ विद्यार्थ्यांनी दिला. टीईटीच्या परीक्षेला ८५२ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. परिषदेच्या सूचनेनुसार सर्व केंद्रांची व्हिडीओ शूटिंग करण्यात आली आहे.

Web Title: girl student suspended for cheating in TET exam by using Bluetooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.