Five passengers were injured in ST accident | भरधाव एस टी घसरून अपघात, पाच प्रवासी जखमी
भरधाव एस टी घसरून अपघात, पाच प्रवासी जखमी

गोंदिया - मातीने माखलेल्या रस्त्यावरून भरधाव एस टी घसरून अपघात झाला, यात पाच  प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना आज सकाळी 7 वाजता घडली. घटनेतील जखमींमध्ये राज बिसेन (13) बाळापूर, समुर बिसेन (13) डोंगरगाव, तारेंद्र रहांगडाले (13) डोंगरगाव, हिमानी उके (13)  सुकडी व इतरांचा समावेश आहे. 


याबाबत सविस्तर असे की, तिरोडा आगाराची एस टी क्र एमएच 40  - 9874 आपली पहिली फेरी सुकडी ते तिरोडा सकाळी 7 वाजताच्या सुमारास धावत होती. मलपुरी ते गराडा दरम्यान रस्त्यावर पसरलेल्या ओल्या मातीमुळे भरधाव एस टी रस्त्यावरून घसरू लागली. चालकाने वेळीच नियंत्रण बसविल्यामुळे एस टी रस्त्याखाली उतरली. यात 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले. एस टी त सुमारे 35 प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान एस टी आगाराला कळवूनही दोन तासांपर्यंत मदत वाहन पाठविण्यात आले नव्हते. याचा प्रवाश्याणी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


Web Title: Five passengers were injured in ST accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.