चोवीस तासांत फायर एक्सटिंग्यूशर अद्ययावत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:34+5:302021-01-15T04:24:34+5:30

लोकमत इम्पॅक्ट संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : भंडाराच्या अग्निकांडानंतर कुठे आरोग्य प्रशासनाला जाग आली आहे. अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयातील ...

Fire Extinguisher Update in 24 Hours () | चोवीस तासांत फायर एक्सटिंग्यूशर अद्ययावत ()

चोवीस तासांत फायर एक्सटिंग्यूशर अद्ययावत ()

googlenewsNext

लोकमत इम्पॅक्ट

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : भंडाराच्या अग्निकांडानंतर कुठे आरोग्य प्रशासनाला जाग आली आहे. अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयातील फायर एक्सटिंग्यूशर मुदतबाह्य झाल्याचे वृत्त लाेकमतच्या बुधवारच्या अंकात प्रकाशित होताच चोवीस तासांच्या आत एक्सटिंग्यूशरची रिफिलिंग करण्यात आली. सताड उघड्या पडलेल्या विद्युत उपकरणांना झाकण लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात फायर एक्सटिंग्यूशरमधील द्रव्ये व भुकटीची कालबाह्यता २९ ऑक्टोबर २०२० रोजी संपली होती. काही संचाची मुदत २८ ऑक्टोबरपर्यंत असली तरी त्यात द्रव्येच नसल्याचे आमच्या चमूला आढळून आले होते. एक्सटिंग्यूशरमधील द्रव्यांची मुदत संपल्याचे लोकमतने उजेडात आणल्यानंतर चोवीस तासांच्या आत द्रव्ये रिफिलिंग होत असेल तर ते त्यापूर्वी का केले गेले नाही. हा प्रश्न अनुत्तरित आहे. विद्युत जोडण्या सताड उघड्या पडल्या आहेत. त्या उपकरणांना झाकणे नाहीत. लोकमतने वाचा फोडताच रुग्णालय प्रशासन जागे झाले व बुधवारी झाकणे लावण्याचे काम सुरू होते. येथे डॉक्टरच राहात नाहीत. मंगळवारी (१२) लसीकरण सभा होती. लसीकरण ही राष्ट्रीय मोहीम असताना या महत्त्वपूर्ण सभेला वैद्यकीय अधीक्षक गैरहजर होते. यापूर्वीसुद्धा या रुग्णालयात अनेकदा गंभीर प्रकार घडलेत. मात्र, वरिष्ठ अधिकारी अशा गंभीर बाबींची दखलच घेत नाहीत. लोकप्रतिनिधी, आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याची पोकळ आश्वासने देतात. प्रत्यक्षात मात्र डॉक्टरांची निष्क्रिय कार्यप्रणाली बघूनही काहीच सुधारणा घडवून आणत नाही, हे जळजळीत वास्तव आहे. माशी शिंकते कुठे? हाच खरा प्रश्न आहे.

.....

पंधरा दिवसांपासून रुग्णवाहिका आजारी

या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका मागील पंधरा दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या येथे १०८ व कोविडची एक अशा दोन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. यासंदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. आता केव्हा रुग्णवाहिका उपलब्ध होते, त्याची प्रतीक्षा आहे. रुग्णालयासाठी जेवढ्या रुग्णवाहिका उपलब्ध आहेत त्यावर एकही स्थायी वाहनचालक नाही. कंत्राटी चालकांवरच रुग्णवाहिकांचा गाडा सुरू आहे.

.......

कर्मचाऱ्यांचा अनुशेष

रुग्णालयात कर्मचाऱ्यांची अनेक रिक्त पदे आहेत. वैद्यकीय अधीक्षकांसह आणखी एक एमबीबीएस डॉक्टर आहे. त्यांच्याकडे आंतररुग्ण व बाह्यरुग्ण तपासणीसाठी वेळच नाही. त्यामुळे एका नियमित एमबीबीएस डॉक्टरची आवश्यकता आहे. नेत्र व एक्स-रे तंत्रज्ञ निवृत्त झाल्याने दोन्ही जागा रिक्त आहेत. आठवड्यातून मंगळवार व शनिवार असे दोन दिवस नवेगावबांध येथील तंत्रज्ञ प्रतिनियुक्तीवर येथे येतो. वॉर्डबॉय व कनिष्ठ लिपिकाचे पद रिक्त आहे. कोविडमधील कंत्राटी परिचारिका रिक्त झाल्याने परिचारिकांची पदे त्यातून भरण्यात आली. मात्र, या रुग्णालयातील एक स्थायी परिचारिका गेल्या दोन वर्षांपासून नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर आहे.

Web Title: Fire Extinguisher Update in 24 Hours ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.