जिल्ह्यातील नऊ दुकानदारांवर गुन्हा दाखल, नियमांचे उल्लघंन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:00 AM2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:25+5:30

भाजीपाला ठेवून विक्री करण्याकरिता फिरवितानी मिळालेल्या भाजी विक्रेत्यावर पोलीस हवालदार उईके यांनी गुन्हा दाखल केला आहे. सातवी कारवाई दुपारी ४.२० वाजता आमगावच्या कामठा चौकात करण्यात आली. एका हॉटेलचालकाने आपले हॉटेल सुरू ठेवल्यामुळे  पोलीस शिपाई सुरेद्र लांजेवार यांनी कारवाई केली आहे. आठवी कारवाई सालेकसा पोलिसांनी केली आहे. गिरोला येथे सायंकाळी ७ वाजता किराणा दुकान सुरू ठेवणाऱ्या आरोपीवर  पोलीस नायक सुमेध चंद्रिकापुरे यांनी कारवाई केली आहे. 

Filed a case against nine shopkeepers in the district, violating the rules | जिल्ह्यातील नऊ दुकानदारांवर गुन्हा दाखल, नियमांचे उल्लघंन

जिल्ह्यातील नऊ दुकानदारांवर गुन्हा दाखल, नियमांचे उल्लघंन

Next
ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे दुर्लक्ष : पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते ११ या काळात दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश दिला. या काळात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व कोरोनासंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून आपण आपला व्यवसाय करू शकता, असा आदेश दिला असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवून दुकाने सुरू ठेवणाऱ्या नऊ दुकानदारांवर गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांनी ४ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. 
यात गोरेगाव पोलिसांनी ४ गुन्हे, आमगाव पोलिसांनी ३ गुन्हे, सालेकसा व चिचगड प्रत्येकी एक गुन्हा असे नऊ गुन्हे दाखल केले आहेत.  गोरेगाव पोलिसांनी पुराना बाजार चौक गोरेगाव येथील आरोपी किराणा दुकानदाराने  नियमांचा भंग करीत दुकान सुरू ठेवल्याने सहायक फौजदार पवार  यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १८८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  दुसरी कारवाई गोरेगाव तालुक्याच्या मुंडीपार येथील पेट्रोलपंप समोर करण्यात आली. चटई टाकून चष्मा विक्री करणाऱ्या एकावर  पोलीस हवालदार राखडे यांनी कारवाई केली आहे. 
तिसरी कारवाई बोटे येथील दुकानदारावर  आहे.  पोलीस हवालदार तिलगाम  यांनी कारवाई केली आहे. चवथी कारवाई तिल्ली मोहगाव येथील आहे. आरोपीने चिकन सेंटर येथे तोंडाला मास्क न लावता, सॅनिटायझर, हात धुण्याचे पाणी, साबणाची कोणतीही व्यवस्था न करता दुकान सुरू ठेवले होते. 
ही कारवाई पोलीस शिपाई मल्लेवार यांनी केली आहे. पाचवी कारवाई आमगाव  पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आली.  कामठा चौक सालेकसा रोड आमगाव येथे आरोपीने मनीहारी ठेल्यात साहित्य विक्री करण्याकरिता फिरविताना व सार्वजनिक ठिकाणी लोकांना गोळा केल्याने पोलीस हवालदार उईके यांनी कारवाई केली आहे. सहावी कारवाई दुपारी ३.१५ वाजता तुकडोजी चौक आमगाव येथे करण्यात आली. 
भाजीपाला ठेवून विक्री करण्याकरिता फिरवितानी मिळालेल्या भाजी विक्रेत्यावर पोलीस हवालदार उईके यांनी गुन्हा दाखल केला आहे. सातवी कारवाई दुपारी ४.२० वाजता आमगावच्या कामठा चौकात करण्यात आली. एका हॉटेलचालकाने आपले हॉटेल सुरू ठेवल्यामुळे  पोलीस शिपाई सुरेद्र लांजेवार यांनी कारवाई केली आहे. आठवी कारवाई सालेकसा पोलिसांनी केली आहे. गिरोला येथे सायंकाळी ७ वाजता किराणा दुकान सुरू ठेवणाऱ्या आरोपीवर  पोलीस नायक सुमेध चंद्रिकापुरे यांनी कारवाई केली आहे. 
नववी कारवाई  चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उचेपूर येथे करण्यात आली. दुपारी १२.४० वाजता खुल्या जागेत भाजीपाल्याचे दुकान लावले. मास्क न लावता भाजी विक्री करीत असल्यामुळे त्याच्यावर ५०० रुपये दंड आकारला; परंतु त्याने दंड भरण्यास नकार दिल्याने  पोलीस शिपाई रवी जाधव यांच्या तक्रारीवरून  चिचगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
सर्व प्रकरणातील आरोपींवर भादंविच्या कलम १८८ २६९,२७०, सहकलम ५१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  तपास पोलीस नायक गंगापारी करीत आहेत.

 

Web Title: Filed a case against nine shopkeepers in the district, violating the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.