क्वारंटाईनच्या भीतीने घरातच दबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:22+5:30

शहरात एक रूग्ण निघाला होता व तो बरा झाल्यानंतर सुमारे ४० दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र परराज्य व जिल्ह्यातील मजुर व अन्य व्यक्तींचे आगमन सुरू झाले व त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडाला आहे. आज जिल्ह्याची आकडेवारी ५३ वर जाऊन पोहचली आहे. मागील ६-७ दिवसांतील ही आकडेवारी असून अचानकच झालेल्या या स्फोटामुळे जिल्हावासी हादरून गेले आहे.

Fear of quarantine at home | क्वारंटाईनच्या भीतीने घरातच दबा

क्वारंटाईनच्या भीतीने घरातच दबा

Next
ठळक मुद्देकुटुंबीयांकडून लपविली जाते माहिती : कित्येक जण घरात असल्याने वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुभार्वात राज्य आघाडीवर असून दिवसागणिक रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशात परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्यांनी स्वत:ची तपासणी करवून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणे गरजेचे झाले आहे. मात्र क्वारंटाईनच्या भीतीमुळे बाहेरून आलेले व्यक्ती घरातच दबा धरून आहेत. शहरात आजही कित्येक जण घरात असून कुटुंबीयांकडून त्यांची माहिती लपविली जात असल्याचे तसेच ऐकू येत आहे. यामुळे मात्र शहरात धोका वाढला असून शहरवासी दहशतीत वावरत आहेत.
शहरात एक रूग्ण निघाला होता व तो बरा झाल्यानंतर सुमारे ४० दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र परराज्य व जिल्ह्यातील मजुर व अन्य व्यक्तींचे आगमन सुरू झाले व त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडाला आहे. आज जिल्ह्याची आकडेवारी ५३ वर जाऊन पोहचली आहे. मागील ६-७ दिवसांतील ही आकडेवारी असून अचानकच झालेल्या या स्फोटामुळे जिल्हावासी हादरून गेले आहे.
विशेष म्हणजे, परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच असून ते पूर्ण जिल्ह्यातच पसरत आहेत. यामुळेच आजघडीला देवरी तालुका सोडून उर्वरीत सातही तालुक्यांत कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.
हा प्रकार बघता बाहेरून येणाºयां व्यक्तींनी सर्वप्रथम आरोग्य विभागाकडून तपासणी व त्यांचा सल्ला ऐकूनच संस्था किंवा घरातच क्वारंटाईन करायचे काय हे ठरविणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून त्यांच्यापासून त्यांना स्वत:ला शिवाय कुटुंबीय व समाजाला धोका निर्माण होणार नाही.
मात्र असे होत नसून बाहेरून येणारे क्वारंटाईनच्या भीतीने घरातच दबा धरून आहेत. शिवाय कुटुंबीयही त्यांची माहिती लपवत असल्याने शहरासाठी धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, आजही शहरात मोठ्या संख्येत बाहेरून आलेले व्यक्ती घरातच असल्याची माहिती आहे.

शिक्षितांकडून अशिक्षितपणाची वागणूक
ग्रामीण भागात येत असलेले मजूर आपल्या घरात राहत असून कुणाचेही ऐकत नसल्याचे ऐकीवात आहे. त्यांचे शिक्षण व परिस्थिती बघता त्यांच्याकडून हे अपेक्षीत आहे. मात्र शहरात बाहेरून येणारे विद्यार्थी व कुटुंबीय घरात बसून असल्याने अशा शिक्षितांकडून हा प्रकार अपेक्षीत नाही. मात्र खेदाची बाब आहे की हे शहरात घडत आहे.
आशा सेविकांची फरफट
भर उन्हात जेथे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे तेथे आशा सेविका आपल्या जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन माहिती संकलीत करीत आहेत. असे असताना मात्र एरवी प्रभागात मिरविणारे नगरसेवक आता दिसत नसल्याचे ऐकीवात आहे. विशेष आपापल्या प्रभागातील घरा-घरांची माहिती त्यांच्याकडे असते. अशात त्यांनी आता पुढे येऊन बाहेरून आलेल्यांची तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील पाऊल उचलण्याची आजची गरज असून यातूनच शहराला सुरक्षीत ठेवता येईल.
पोलीस कर्मचारी द्यावे सोबतीला
शहरात प्रत्येकच भागात बाहेरून आलेल्यांनी घरात दबा धरल्याचे बोलले जात आहे. याबाबत शेजाºयांनाही माहिती असते. मात्र माहिती दिल्यास आपसातील संबंध खराब होतील यामुळे कुणीही काही बोलायला तयार नाही. शिवाय कुणी काही सांगायला गेल्यास वादविवाद व मारहाण होत असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. अशात पोलिसांनी पुढाकार घेऊन अशांना उचलावे असेही शहरवासी बोलत आहेत.

Web Title: Fear of quarantine at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.