मका खरेदी केंद्राला ग्रहण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:37+5:30

रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली व पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाले नाही. खा. प्रफुल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर तालुक्यात एकमेव खरेदी केंद्र सुरू झाले. त्याला प्रशासनाच्या व खरेदी केंद्रावरील संचालक मंडळाच्या नियोजनशून्य कार्यप्रणालीची दृष्ट लागली व हे केंद्र अल्पावधीतच बंद पडले.

Eclipse of Maize Shopping Center! | मका खरेदी केंद्राला ग्रहण !

मका खरेदी केंद्राला ग्रहण !

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : खरेदी केंद्रात मका उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : कोरोनामुळे रोजगार नसल्याने आधीच शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट झाली आहे. मकापीक निघाले व कसेबसे तालुक्यात एकमेव केंद्र सुरू झाले. मका विकून आलेल्या पैशात कोरोनाचे संकट पेलवू असे स्वप्न रंगवत असतानाच बारदाना व गोदामात जागा नाही म्हणून खरेदी बंद झाली. खरेदी केंद्रावर मका उघड्यावर पडून आहे. दररोज सायंकाळी ढग दाटून पावसाची रिपरिप सुरू होते. कोरोना संकटाचा सामना कसा करावा या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली व पीक निघाले. मात्र आधारभूत हमीभाव मका खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाले नाही. खा. प्रफुल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यानंतर तालुक्यात एकमेव खरेदी केंद्र सुरू झाले. त्याला प्रशासनाच्या व खरेदी केंद्रावरील संचालक मंडळाच्या नियोजनशून्य कार्यप्रणालीची दृष्ट लागली व हे केंद्र अल्पावधीतच बंद पडले. पर्यायी दुसरे खरेदी केंद्र नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने सुरुवातीला खासगी व्यापाºयांनी मातीमोल भावात मका खरेदी करून शेतकºयांच्या गरजेचा गैरफायदा घेत पिळवणूक केली. आता सुलतानी संकटाचे ग्रहण आहे.
शेतकºयांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी नगदी पिकाकडे वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो. विश्वास ठेवून शेतकरी ते करतात. मात्र पीक हातात आल्यानंतर विक्रीसाठी किती यातना भोगाव्या लागतात हे दुखणे ऐकण्यासाठी शेतकºयांकडे कुणीतरी फिरकतो असे आठवत नाही. याऐवजी धानपिक घेतले असते तर आतापर्यंत चुकारे घेऊन नक्की झाले असते असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सुमारे ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्रात मका पीक लागवड करण्यात आली. अजूनही बराच मका उघड्यावर आहे. यावर्षी मान्सून वेळेवर झाला व प्रशासनाचे असेच भिजत घोंगडे राहिल्यास शेतकºयांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. याउलट विचार केला तर पीक बदल शेतकºयांना वरदान ठरू शकते. मात्र यासाठी प्रशासनाने खंबीरपणे शेतकºयांच्या पाठीशी उभे राहणे अत्यावश्यक असल्याचे आजच्या स्थितीतून दिसून येत आहे.

बारदाना व गोदामाची बाधा आहे. वाहतुकीचे नियोजन झाले आहे. उद्या-परवा हा प्रश्न निकाली निघेल. बारदाना कंटेनर केंद्र शासनाकडून येतो. सोमवारी सायंकाळ पर्यंत येणार होतं. येताच पुरवठा करू. त्यानंतर पूर्ववत खरेदी सुरू होईल. या क्षेत्रात पहिल्यांदाच मका लागवड झाली. सुमारे १५ हजार क्विंटल खरेदी होईल. खरेदी पहिल्यांदाच होत असल्याने अडचण येत आहे. या अडचणी पुढच्या खरेदी वेळी येणार नाहीत. शेतकºयांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
-राहुल पाटील, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ कार्यालय नवेगावबांध

Web Title: Eclipse of Maize Shopping Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार