वाढतच आहे मृतांची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:37+5:302021-01-15T04:24:37+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात दिसत असतानाच कमी प्रमाणात का असेना मात्र बाधितांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. अशात ...

The death toll is rising | वाढतच आहे मृतांची आकडेवारी

वाढतच आहे मृतांची आकडेवारी

Next

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात दिसत असतानाच कमी प्रमाणात का असेना मात्र बाधितांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. अशात मात्र मृतांची संख्याही वाढत चालली असून जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा १८१ पर्यंत पोहचला आहे. यात हॉटस्पॉट असलेला गोंदिया तालुका आघाडीवर असून गोंदिया तालुक्यात १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी १३,९८९ एवढी झाली असून त्यातील १३,५५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसत आहे. नक्कीच हा दिलासादायक आकडा असला तरीही दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे आजही जिल्ह्यात २४९ क्रियाशील रुग्ण आहेत. एकंदर कोरोना नियंत्रणात दिसत असला तरी त्याचा विळखा पूर्णपणे सुटलेला नाही हे दिसून येत आहे. मात्र टेन्शन वाढविणारी बाब म्हणजे, दररोजची कोरोना बाधितांची संख्या कमी असतानादेखील मृतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये अगोदरपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

....

लसीकरणानंतरही उपाययोजनांची गरज

कोरोनावर लस मिळाली असून त्यातही आता शनिवारपासून लसीकरण केले जाणार आहे. अगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस लावली जाणार असून त्यानंतर काही दिवसांनी का होईना मात्र सर्वसामान्यांनाही लस उपलब्ध होणार यात शंका नाही. मात्र लस लावल्यानंतरही कोरोना संपणार नसून आवश्यक त्या उपाययोजनाची गरज असणार, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता आजही मास्क, फिजिकल डिस्टस्टिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे.

Web Title: The death toll is rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.