कोविड केअर सेंटर्सची ‘पोझिशन टाईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:00 AM2021-04-11T05:00:00+5:302021-04-11T05:00:20+5:30

गोंदिया शहरात असलेल्या सेंटर्सवर जास्त भार पडतो. कारण सर्वाधिक बाधित गोंदिया तालुक्यातील असून अन्य तालुक्यांतील रूग्णही उपचारासाठी गोंदियाकडे धाव घेतात. अशात येथील कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांची संख्या वाढून बेड उपलब्ध होत नव्हते. आता मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना आपला पुन्हा एकदा कहर करीत आहे. सध्या दररोज ६०० हून अधिक बाधितांची भर पडत आहे.

Covid Care Centers' Position Tight | कोविड केअर सेंटर्सची ‘पोझिशन टाईट’

कोविड केअर सेंटर्सची ‘पोझिशन टाईट’

Next
ठळक मुद्देअर्धेअधिक बेड भरले : मागील वर्षाची स्थिती उद्भवणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना बाधित झाल्यानंतरही गंभीर स्थिती नसलेल्या तसेच घरी अलगीकरणाची व्यवस्था नसलेल्या रूग्णांसाठी पॉलिटेक्निक कॉलेज (फुलचूर) व जिल्हा क्रीडा संकुल (मरारटोली) येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र आताच या दोन्ही सेंटर्समधील अर्धेअधिक बेड भरल्याचे दिसत आहे. मागील वर्षी कोरोना कहर वाढताच बेडचा तुटवडा निर्माण झाला होता. अशात आजची स्थिती बघता मागील वर्षाची स्थिती उद्भवण्याची शक्यता टाळता येत नाही. 
मागील वर्षी कोरोना आल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला होता. त्यावेळी सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांना ठेवण्यात आले होते. मात्र गोंदिया शहरात असलेल्या सेंटर्सवर जास्त भार पडतो. कारण सर्वाधिक बाधित गोंदिया तालुक्यातील असून अन्य तालुक्यांतील रूग्णही उपचारासाठी गोंदियाकडे धाव घेतात. अशात येथील कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांची संख्या वाढून बेड उपलब्ध होत नव्हते. 
आता मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना आपला पुन्हा एकदा कहर करीत आहे. सध्या दररोज ६०० हून अधिक बाधितांची भर पडत आहे. यात घरी अलगीकरणाची सोय नसलेल्यांसाठी पॉलिटेक्निक कॉलेज व जिल्हा क्रीडा संकुलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता वाढती रूग्ण संख्या बघता या दोन्ही सेंटर्समधील अर्धेअधिक बेड्स भरले आहेत. अशात वाढती रूग्ण संख्या बधता पुढील काळात बेड मिळणे कठीण होणार असल्याचे दिसते. 
पॉलिटेक्निकमध्ये ११७ तर क्रीडा संकुलमध्ये ६९ बेड शिल्लक 
फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये २८० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यातील १६३ बेड्स भरले असून आता ११७ बेड्स शिल्लक आहेत. तर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये १४० बेड्सची व्यवस्था असून त्यातील ७१ बेड्स भरले असल्याने ६९ बेड शिल्लक आहेत. मात्र ग्रामीण भागात पुरेपूर व्यवस्था आहे. 
समाज व संघटनांनी दिली होती साथ 
मागील वर्षी कोरोना कहरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन व जिल्हावासीयांना मदतीचा हात देत येथील काही समाजबांधव व संघटना पुढे आल्या होत्या. काही संघटनांनी जेवणाची जबाबदारी उचलली होती. तर येथील अग्रवाल समाजाने अग्रसेन भवन येथे नाममात्र शुल्क आकारून कोविड केअर सेंटर उभारले होते. त्याचा जिल्हावासी व जिल्हा प्रशासनाला नक्कीच हातभार लागला होता.

 

Web Title: Covid Care Centers' Position Tight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.