कोरोनानंतरचे साइड इफेक्टस वाढले; औषधी काळजीपूर्वक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:00 AM2021-05-12T05:00:00+5:302021-05-12T05:00:25+5:30

कोरोनानंतरचे साईड इफेक्ट्स वाढले तर औषधी काळजीपूर्वक घ्या, असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत. ज्या रुग्णांमध्ये मधुमेह आहे तसेच आयसीयूमध्ये अधिक काळ उपचार घेत असलेल्यांनी काळजी घेतली नाही तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली आहेत. यात राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्णही आढळले आहेत. गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आतापर्यंत आठ ते दहा रुग्णांची नोंद व उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Coronary side effects increased; Take the medicine carefully | कोरोनानंतरचे साइड इफेक्टस वाढले; औषधी काळजीपूर्वक घ्या

कोरोनानंतरचे साइड इफेक्टस वाढले; औषधी काळजीपूर्वक घ्या

Next
ठळक मुद्देमधूमेह आणि आयसीयुमध्ये उपचार घेणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज पाच-सहा रुग्णांची नोंद होत आहे. स्टेरॉईडचा अतिवापर तसेच कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना या आजाराची लागण होत आहे. परिणामी कोरोनानंतरचे साईड इफेक्ट्स वाढले तर औषधी काळजीपूर्वक घ्या, असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत. ज्या रुग्णांमध्ये मधुमेह आहे तसेच आयसीयूमध्ये अधिक काळ उपचार घेत असलेल्यांनी काळजी घेतली नाही तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली आहेत. यात राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्णही आढळले आहेत. गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आतापर्यंत आठ ते दहा रुग्णांची नोंद व उपचार सुरू असल्याची माहिती आहे.  म्युकरमायकोसिसपासून संरक्षण करण्यासाठी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासावी असे सांगण्यात येते.   म्युकरमायकोसिस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मायक्रोबायोलॉजिस्ट, न्युरोलॉजिस्ट, ईएनटी डॉक्टर्स, ऑप्थॅमोलॉजिस्ट, डेन्टिस्ट, सर्जन, बायोकेमिस्ट यांच्याशी त्वरित भेटून सल्ला घेणे आवश्यक आहे..

काय होतात परिणाम
म्युकरमायकोसिस आजार झाल्यास रुग्णांमध्ये नाक बंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचे हाड दुखणे, चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे,  दात दुखणे, दात हलणे व पडणे, जबडा दुखणे, डोळे दुखणे, छाती दुखणे, श्वास घेण्यात त्रास आदी लक्षणे दिसू लागतात. नाक बंद झालेल्या सर्वच रुग्णांना हा आजार झाल्याचे समजू नका. हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. जे रुग्ण जास्त काळ  इतर आजारांचा उपचार घेतात त्यांची वातावरणातील रोगजंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. अशावेळी या संसर्गाचा धोका वाढतो.

रेमडेसिविरचे साईड इफेक्टस
रेमडेसिविरचा वापर पूर्णपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, मात्र उपचाराच्या प्रायोगिक पद्धतीनुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये या इंजेक्शनचा वापर केला जात आहे.  संसर्ग झालेल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पाच दिवसांसाठी इंजेक्शनचा डोस देण्यात यावा. दहा दिवसांसाठी हा डोस देण्याची गरज नाही. हे इंजेक्शन दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये उलट्या होणे, हातपाय थरथरणे, जुलाब, चक्कर येण्यासारखे त्रासही दिसून आले आहेत.

काय काळजी घ्यायची 

धूळ असलेल्या ठिकाणी किंवा बांधकामाच्या  ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा. हा बुरशीजन्य आजार आहे. स्वच्छता पाळा तसेच अन्य नियमांचे पालन करा. या आजारावरील ‘एम्फोटेरीसीन बी’ हे इंजेक्शन महागडे आहे. परिणामी लक्षणे दिसताच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करा. 
- डॉ. संजय भगत
ईएनडी तज्ज्ञ 

काेरोना रुग्णाला म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास याबाबत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सुचविलेला औषधोपचार करावा. याबाबत संशय आल्यानंतर किंवा तसे स्पष्ट झाल्यानंतर औषधोपचार घेण्यास उशीर करू नका.या आजाराची लक्षणे दिसताच क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.
- डॉ. विकास जैन, अध्यक्ष आयएमए.

 

Web Title: Coronary side effects increased; Take the medicine carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.