कोरोनाचा विळखा होतोय सैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:41+5:302021-01-15T04:24:41+5:30

गोंदिया : मागील तीन महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सातत्याने वाढ झाली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या विळख्यात असल्याचे ...

The corona is getting loose | कोरोनाचा विळखा होतोय सैल

कोरोनाचा विळखा होतोय सैल

Next

गोंदिया : मागील तीन महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सातत्याने वाढ झाली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या विळख्यात असल्याचे चित्र होते. मात्र मागील महिनाभरापासून कोरोना रुग्ण संख्येला ब्रेक लागला असून कोरोनाचा विळखा सैल होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

गुरुवारी (दि. १४) जिल्ह्यात २८ बाधितांची नोंद झाली तर २६ कोरोना बाधितांनी मात केली. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने एका ७३ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या २६ रुग्णांमध्ये सर्वाधिक १२ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ५, आमगाव ६, सालेकसा ३, देवरी १ आणि बाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ५९,८३१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४८३०० नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली आहे. या अंतर्गत ६२४६७ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात ५६,४३७ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १३,९८९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १३,५५९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २४९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

Web Title: The corona is getting loose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.