कुणाच्या जाण्याने काँग्रेस कमजोर होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 06:00 AM2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:21+5:30

आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रथमच पुढे येत शहीद भोला काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, पी.जी.कटरे,पृथ्वीपालसिंग गुलाटी, योगेंद्र कटरे,आलोक मोहंती, हरिष तुळस्कर उपस्थित होते.

Congress is not weakened by anyone's passing | कुणाच्या जाण्याने काँग्रेस कमजोर होत नाही

कुणाच्या जाण्याने काँग्रेस कमजोर होत नाही

Next
ठळक मुद्देपुरूषोत्तम कटरे : पक्ष सोडून जाणाऱ्यांचा निष्कासित करण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आ. गोपालदास अग्रवाल हे काँग्रेस पक्ष सोडून गेल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष दुबळा झाला,पक्षाकडे नेतृत्त्वाचा अभाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या सर्व चर्चा निर्धार असून कुणा एकाच्या जाण्याने काँग्रेस पक्ष कधीच कमजोर होणार नाही. जिल्ह्यात काँग्रेस विचारधारेच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असून ही पक्षाची मोठी तिजोरी आणि ताकद आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जोमाने कामाला लागणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रथमच पुढे येत शहीद भोला काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, पी.जी.कटरे,पृथ्वीपालसिंग गुलाटी, योगेंद्र कटरे,आलोक मोहंती, हरिष तुळस्कर उपस्थित होते.पुरूषोत्तम कटरे म्हणाले आ.अग्रवाल यांच्यासह जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे,शहरध्यक्ष अशोक चौधरी,तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर यांच्यासह पाच जि.प.आणि तीन पं.स.सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून निष्कासीत करण्याचा प्रस्ताव जिल्हा काँग्रेसच्या कोअर कमिटीने प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविला आहे.त्यांच्यावर निष्कासीत करण्याची कारवाई शुक्रवारनंतर होणार आहे.तर पुन्हा कोणते पदाधिकारी भाजपमध्ये गेले याची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून हा संभ्रम दूर करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी लवकरच गावागावात जातील. काँग्रेसचे पदाधिकारी हे आजपर्यंत केवळ काँग्रेसच्या विचारधारेमुळेच आ.अग्रवाल यांच्यासोबत होते.आता त्यांच्या आणि आमचे मार्ग वेगळे आहे.गोंदिया विधानसभा क्षेत्रातून दमदार उमेदवार देऊन काँग्रेस पक्ष या क्षेत्रात निश्चितच बळकट केला जाईल. तसेच कार्यकर्ते हे आ.अग्रवाल यांच्यासोबत नव्हे तर काँग्रेस पक्षासोबत होते असे सांगितले.

गोंदिया काँग्रेसकडे?
गोंदिया विधानसभा क्षेत्र हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा पांरपारिक मतदारसंघ राहिला आहे.त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असणार आहे.गोंदिया आणि आमगाव काँग्रेस तर अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात राहणार असल्याचे पुरूषोत्तम कटरे यांनी सांगितले.
गुरूवारी उमेदवाराची घोषणा
गोंदिया विधानसभा क्षेत्रातून उमेदवारीसाठी पूर्वी अमर वऱ्हाडे,विजय बहेकार यांची नावे पाठविण्यात आली होती. मात्र मंगळवारी पुरुषोत्तम कटरे आणि पी.जी.कटरे यांची नावे कोअर कमिटीकडून पाठविण्यात आली. गुरूवारी सायंकाळी अधिकृत उमेदवाराची घोषणा होणार असल्याचे विनोद जैन यांनी सांगितले.

Web Title: Congress is not weakened by anyone's passing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.