दिलासा ! बाधितांपेक्षा मात करणारे रूग्ण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 05:00 AM2021-03-10T05:00:00+5:302021-03-10T05:00:22+5:30

राज्यात सध्या कोरोना पुन्हा फोफावत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यातही बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातही कोरोना आपले हायपाय पसरत असल्याचे दिसत आहे. अशात मात्र मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात १२ बाधितांची भर पडली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८, आमगाव ३ देवरी तालुक्यातील १ रुग्ण आहेत, तर २२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १९, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव १ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे.

Comfort! Twice as many patients as overweight | दिलासा ! बाधितांपेक्षा मात करणारे रूग्ण दुप्पट

दिलासा ! बाधितांपेक्षा मात करणारे रूग्ण दुप्पट

Next
ठळक मुद्दे१२ बाधितांची वाढ : २२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या सातत्याने वाढत असतानाच मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात १२ बाधितांची भर पडली असून २२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. म्हणजेच, बाधितांपेक्षा दुपटीने मात करणाऱ्या रुग्णांची आकडेवारी असल्याने दिलासा मिळाला. यानंतर आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४५८२ एवढी झाली असून यातील १४२३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आता १६३ रुग्ण क्रियाशील आहेत.
राज्यात सध्या कोरोना पुन्हा फोफावत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यातही बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातही कोरोना आपले हायपाय पसरत असल्याचे दिसत आहे. अशात मात्र मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात १२ बाधितांची भर पडली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८, आमगाव ३ देवरी तालुक्यातील १ रुग्ण आहेत, तर २२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १९, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव १ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे.
यानंतर आता जिल्ह्यात १६३ रुग्ण क्रियाशील असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ११०, तिरोडा १०, गोरेगाव ७, आमगाव १९, देवरी ५, सडक-अर्जुनी ४, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, क्रियाशील असलेल्या या रुग्णांमधील १२० रुग्ण घरीच अलगीकरणात असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८७, तिरोडा ७, गोरेगाव ४, आमगाव १३, देवरी ३, सडक-अर्जुनी २ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ रुग्ण आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत १४६३७१ चाचण्या
 कोरनाचा वाढता उद्रेक बघता आता कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून आतापर्यंत १४६३७१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७५१७७ आरटी-पीसीआर चाचण्या असून यातील ८६४५ चाचण्या पॉझिटिव्ह, तर ६३१६६ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच ७११९४ रॅपिड अँटिजन चाचण्या असून यातील ६२३३ पॉझिटिव्ह, तर ६४९६१ निगेटिव्ह आल्या आहेत.

जिल्ह्यातील १८७ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात मृतांची संख्या दिवसेंदिवत वाढतच चाचली असून कोरोनाने आतापर्यंत १८७ रुग्णांचा जीव घेतला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०५, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत.
 
Web Title: Comfort! Twice as many patients as overweight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.