पाच वर्षांत किती विकास कामे केली मुख्यमंत्र्यांनी सांगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:04 AM2019-08-18T00:04:52+5:302019-08-18T00:05:22+5:30

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे.

Chief Minister should tell how many development works have been done in five years | पाच वर्षांत किती विकास कामे केली मुख्यमंत्र्यांनी सांगावे

पाच वर्षांत किती विकास कामे केली मुख्यमंत्र्यांनी सांगावे

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल । आघाडी करुन लढल्यास दोन्ही पक्षाला फायदा, पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे.मागील पाच वर्षांत जिल्हा विकासात पूर्णपणे माघारल्याचा आरोप खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
स्थानिक नमाद विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही. शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या कायम आहेत.तर सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने धानाला प्रती क्विंटल ४ हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येताच या आश्वासनाचा सुध्दा सरकारला विसर पडला असून धानाला केवळ ५०० रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची छळणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले असून नीतीमत्ता आणि प्रतिमेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
रेतीमाफीया, कंत्राटदार यांना स्थान देऊन राजकारण गढूळ केले जात आहे. त्यामुळे जनतेलाच आता याबाबत योग्य निर्णय घ्यावा लागणार असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. मागील पाच वर्षांत सांगता येण्यासारखे एकही ठोस विकास विद्यमान सरकारने केले नाही.त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना सुध्दा त्याचे उदाहरण देता आले नसल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला.

काँग्रेस-रॉष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार यात कुठलेही दुमत नाही. जागा वाटपाची प्रक्रिया सुध्दा लवकरच होणार आहे.गोंदिया-भंडारा जिल्ह्यात किती जागा राष्ट्रवादी आणि किती जागा काँग्रेसने लढव्यात यासाठी आपण पुढाकार घेवून त्यावर मार्ग काढू.या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढल्यास निश्चितच त्याचा फायदा होईल यात शंका नाही असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
कलम ३७० हटविण्याचे श्रेय घेऊ नये
जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटविण्याला आमच्या पक्षाचा कधीच विरोध नव्हता. मात्र सत्तारुढ पक्षाकडून विरोध असल्याचे सांगितले जात आहे.भारताच्या संविधानात कलम ३७० तरतूद डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी केली होती. केंद्र सरकारने केवळ संविधानातील तरतूदीची अंमलबजावणी केली.त्यामुळे त्याचे श्रेय कुणीही घेण्याची गरज नसल्याचे खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Web Title: Chief Minister should tell how many development works have been done in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.