पोळ्याची परंपरा टिकवून ठेवण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 09:50 PM2019-08-29T21:50:52+5:302019-08-29T21:52:00+5:30

आजच्या धावपळीच्या युगात निवांतपणे सण साजरे करण्यासाठी लोकांकडे वेळेचा अभाव आणि इतर गोष्टी लक्षात घेता पोळ्याच्या सणाची संस्कृती, परंपरा टिकवून ठेवणे मोठे आव्हानात्मक ठरत आहे. आजही पोळ्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

The challenge of maintaining the tradition of the hive | पोळ्याची परंपरा टिकवून ठेवण्याचे आव्हान

पोळ्याची परंपरा टिकवून ठेवण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देयंत्रयुगात बैलाच्या संख्येत घट : कमी होत चालला पोळ्याचा उत्साह

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. आता पोळ्याची संस्कृती जपून ठेवणे किंवा परंपरा टिकवून ठेवणे हे यंत्र युगात मोठे आव्हान झालेले आहे. या मागे वेगळे तर्क वितर्क दिले जातात. परंतु याबाबत गांभीर्याने विचार केल्यास तोट्यात जाणारी शेती,शेतात यंत्राचा मोठ्या प्रमाणावर होणारा उपयोग, महाग होत चाललेले पशुपालन आदी कारणामुळे शेतकऱ्यांच्या घरी बैल जोड्यांची संख्या कमी होत चालली आहे.
आजच्या धावपळीच्या युगात निवांतपणे सण साजरे करण्यासाठी लोकांकडे वेळेचा अभाव आणि इतर गोष्टी लक्षात घेता पोळ्याच्या सणाची संस्कृती, परंपरा टिकवून ठेवणे मोठे आव्हानात्मक ठरत आहे. आजही पोळ्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यातच विदर्भामध्ये हा सण शेतकºयांसाठी सर्वात महत्त्वाचा असून बळीराजा या सणाची आतुरतेने वाट पाहतो.या परंपरेला कायम ठेवण्याचे पुरेपुर प्रयत्न करतो.श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पिठोरी अमावस्या किंवा कुशावटी अमावस्येला हा साजरा केला जातो. ऑगस्ट महिना सणाचा महिना ठरतो.या महिन्यात हरियाली अमावस्या, नागपंचमी,रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा व गोकुळाष्टमी सारखे महत्त्वाचे सण आठ ते पंधरा दिवसाच्या अंतरात येतात. श्रावणाच्या अमावस्येला पोळ्याचा सण येतो.धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवजीचे वाहन नंदी बैल त्यांचे जीवलग मित्रासारखे होते.सर्व चराचरात शिवजी नेहमी पूजा केली जायची. परंतु नंदीचीची पूजा होत नसे अशात एके दिवशी भगवान शिवजीने माता पार्वतीसमोर आपल्या लाडक्या नंदीला सजवून पूजन करीत सन्मान देण्याचा प्रस्ताव मांडला तो प्रस्ताव माता पार्वतीने हसत स्वीकार केला. श्रावण महिन्याच्या कुशावटी अमावस्येला भगवान शंकराने नंदी धुतला त्याला सजविले तर माता पार्वतीने नंदीला भरविण्यासाठी पूरण पोळ्या बनविल्या.त्यानंतर दोघांनी नंदीचे विधीवत पूजन करुन पुरणपोळ्या खाऊ घातल्या.यामुळे नंदी मोठा आनंदित झाला.तेव्हापासून पोळ्याचा सण सुरु झाल्याचे बोलले जाते.
शेतकरी बांधवाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतकºयांचे जीवलग असलेले बैल पेरणीपासून रोवणीच्या कामापर्यंत शेतकºयासोबत सतत राबत असतात. पोळ्यापर्यंत जवळपास रोवणीची कामे आटोपलेली असतात आणि शेतीच्या कामात सतत जुंपलेल्या बैलांना विश्रांती देऊन त्याची पूजा केली जाते. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांच्याकडे शेती किंवा बैल नाही ते मातीचे बैल बनवून पोळा साजरा करतात.परंतु बैलाच्या जोडीच्या पूजनाचे मोठे महत्त्व आहे. शेतात नांगर चालवितांना बैलाच्या खांद्यावर जखम किंवा सूज आलेली असते.तसेच बैलांना हाकतांना तुतारीच्या जखमा सुध्दा झालेल्या असतात त्या जखमा दुरुस्त करण्यासाठी हळद आणि तूप किंवा तेलचा लेप लावला जातो. पहाटे उठून बैलांना नदी नाल्यावर किंवा तलावात नेऊन व्यवस्थीत धुऊन स्वच्छ केले जाते.बैल गडी आपल्या बैल जोडीला सजविण्यासाठी मखमली खुली अंगात घालतात किंवा अंगावर रंगीत ठिपके लावतात. बेलपत्र आणि फुलांचे हार तसेच घुंघरमाळे घातली जाते. यादिवशी शेतकरीबांधव बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्यासाठी पुरणाच्या पोळ्या व इतर खास व्यंजन तयार केले जाते. गावातील कोतवाल गाव शेजारी आंब्याच्या पानाचे तोरण बांधतो. सायंकाळी त्या तोरणाखाली नेण्यासाठी बैल जोड्यांची मिरवणूक काढीत ढोल ताशाच्या गजरात तोरणात बैलांना उभे करुन आराध्य देवतांचे पूजन करीत पोळ्याच्या झळत्या घेतल्या जातात.या वेळी हरबोला हर हर महादेवाचा गजर चालतो केला जातो.
का कमी होऊ लागल्या बैलजोड्या
आजच्या यंत्र युगात बैलाच्या जागी अनेक शेतकरी ट्रॅक्टर, हार्वेस्टर व इतर यंत्राच्या सहायाने पेरणी, रोवणी, कापणी, मळणीची कामे करित आहे. त्यामुळे घरी बैलाची जोडी ठेवने तेवढे गरजेचे वाटत नाही.तसेच शेतकऱ्यांना बैलाच्या जोडीला वर्षभर भरण पोषण करावे लागत असून न परवडणाऱ्या शेतीमुळे बैल पालन करणे महागात जाते. दुसरीकडे गोवंशला कत्तलखान्यात नेण्याचे प्रमाण अलीकडे खूप वाढले असून पशुधनात मोठी घट झालेली आहे.अशात एक चांगली बैल जोडी खरेदी करणे अनेक शेतकºयांच्या अवाक्याबाहेर झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना घरी शेती करणे महागात पडत असून अलीकडे शेतीला बटई देण्याचे प्रमाण सुद्धा वाढले. त्यामुळे बैल जोड्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.

Web Title: The challenge of maintaining the tradition of the hive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.