धान उत्पादकांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:00 AM2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:00:49+5:30

गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दिवसेंदिवस धानाच्या एकरी लागवड खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच अल्प असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली होती. याचीच दखल घेत खा. पटेल यांनी धानाला प्रती क्विंटल दोन हजार ५०० रु पये हमीभाव देण्याची मागणी केली होती.

The bonus amount starts accumulating in the account of the paddy grower | धान उत्पादकांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होण्यास प्रारंभ

धान उत्पादकांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होण्यास प्रारंभ

Next
ठळक मुद्दे२१४.८१ कोटींचा निधी प्राप्त : प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ५०० बोनस आणि हिवाळी अधिवेशन दरम्यान धानाला प्रती क्विंटल २०० रु पयांची दरवाढ जाहीर केली होती. ‘लॉकडाऊन’मुळे सध्या शेतकरी अडचणीत असून त्यांना बोनसची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी २ दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करु न बोनसची रक्कम त्वरीत जमा करण्याची मागणी केली होती. याचीच दखल राज्य सरकारने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यासाठी एकूण २१४ कोटी ८१ लाख रु पयांची रक्कम दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे वळती केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दिवसेंदिवस धानाच्या एकरी लागवड खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यातुलनेत धानाला मिळणारा हमीभाव हा फारच अल्प असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली होती. याचीच दखल घेत खा. पटेल यांनी धानाला प्रती क्विंटल दोन हजार ५०० रु पये हमीभाव देण्याची मागणी केली होती.
राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्र ी करणाºया शेतकऱ्यांना प्रती क्विंटल एक हजार ८३५ रु पये हमीभाव जाहीर केला होता. तर खासदार पटेल यांच्या निवेदनाची दखल घेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान धानाला प्रती क्विंटल ५०० रु पये बोनस आणि २०० रु पये भाववाढ जाहीर केली होती. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या  शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रु पये अतिरिक्त मिळाल्याने जवळपास दोन हजार ५३५ रु पये मिळण्यास मदत झाली.
बोनससह एकूण ७०० रु पयांचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी १९५ कोटी रु पयांची गरज होती. तर भंडारा जिल्ह्यासाठी जवळपास एवढ्याच रक्कमेची गरज होती. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला.
‘लॉकडाऊन’मुळे शेतमालाला मागणी नसल्याने शेतकयांची आर्थिक कोंडी झाली होती. याचीच दखल घेत खा. पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्र व्यवहार आणि फोनवरु न चर्चा करु न बोनसचा निधी त्वरीत देण्याची मागणी केली होती. त्याचीच दखल घेत दोन्ही जिल्ह्यांना हा निधी उपलब्ध करु न देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘लॉकडाऊन’च्या काळात दिलासा मिळाला असून त्यांनी खा.पटेल यांचे आभार मानले आहे.

१०१ कोटी रु पयांचा निधी शेतकºयांच्या खात्यावर वळता
गोंदिया जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्र ी करणाऱ्या एकूण ९३ हजार शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार असून यासाठी १९५ कोटी रु पयांची गरज होती. यापैकी पहिल्या टप्प्यात शासनाने ११३ कोटी रु पयांचा निधी प्राप्त करु न दिला आहे. तर यापैकी १०१ कोटी ८१ लाख रु पयांचा निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे.

‘लॉकडाऊन’च्या काळात धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होवू नये, तसेच बोनसची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यांसाठी २१४ कोटी ८१ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करु न देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
- प्रफुल्ल पटेल, खासदार.

Web Title: The bonus amount starts accumulating in the account of the paddy grower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.