पर्यटकांच्या गर्दीने बहरले इटियाडोह धरणाचे सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:31 PM2019-09-09T23:31:44+5:302019-09-09T23:32:02+5:30

तब्बल सहावर्षानंतर इटियाडोह धरण शंभर टक्के भरुन ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा वाहणारा विसर्ग पर्यटकांसाठी पर्वणीच ठरु पाहात आहे. दिवसेंदिवस आठवड्याच्या शनिवार, रविवारला तर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.या वर्षीच्या संततधार पावसाने इटियाडोह धरणातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

The beauty of the Ittiadoh Dam is overwhelmed by the crowds of tourists | पर्यटकांच्या गर्दीने बहरले इटियाडोह धरणाचे सौंदर्य

पर्यटकांच्या गर्दीने बहरले इटियाडोह धरणाचे सौंदर्य

Next
ठळक मुद्देओव्हरफ्लो पाहण्यासाठी गर्दी : स्थानिकांना मिळतोय रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या गोठणगाव व येथील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. चारही बाजूने हिरवेगार शालू लेवून उभ्या असलेल्या डोंगररांगा पर्यटकांच्या आनंदात साद घालत आहेत. त्यातच हे धरण पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
तब्बल सहावर्षानंतर इटियाडोह धरण शंभर टक्के भरुन ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा वाहणारा विसर्ग पर्यटकांसाठी पर्वणीच ठरु पाहात आहे. दिवसेंदिवस आठवड्याच्या शनिवार, रविवारला तर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.या वर्षीच्या संततधार पावसाने इटियाडोह धरणातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ओव्हरफ्लो पाहण्याची संधी निसर्गाने पर्यटकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. इटियाडोह धरणाचा ओव्हरफ्लो पाहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातूनच नव्हे तर नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा,गडचिरोली जिल्ह्यातून पर्यटक येत आहेत. याठिकाणी येणारे पर्यटक नवेगावबांध अभयारण्य,धार्मिक स्थळ प्रतापगड आणि तिबेट कॅम्प, बंगाली कॅम्प येथे राहणाºया लोकांची संस्कृती पाहण्यासाठी सुध्दा आर्वजून भेट देतात.या परिसरातील विलोभनीय निसर्गदृश्य पर्यटक नजरेत साठवून परतीच्या मार्गाला लागतात.इटियाडोह धरणातील ओव्हरफ्लोद्वारे पाण्याचा विसर्ग ज्या गाढवी नदीमधून प्रवाहित होत ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. इटियाडोह धरणातून १ फूट पाण्याचा विसर्ग सुरु असून या पर्यटनस्थळी प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.येथील मुलभूत सोई सुविधेकडे इटियाडोह प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.काट्या बाजूला सारुन पर्यटक प्रभावित क्षेत्रात प्रवेश करताना दिसतात.कित्येक पर्यटकांना इटियाडोह धरणातील वाहणाºया पाण्याजवळ जाऊन तर काहींना धरणाच्या सुरक्षा भिंतीवर चढून सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. यामध्ये तरुण पिढीला मध्यम वयाचे स्त्री-पुरुष सेल्फी काढून शेअर करण्याच्या कामात गुंतलेले दिसतात. या इटियाडोह धरणाचा पर्यटन स्थळामध्ये समावेश असला तरी पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी सोई-सुविधा उपलब्ध नाहीत.या दुर्लक्षीत पर्यटन स्थळाकडे शासनाने लक्ष दिल्यास हे स्थळ राष्टÑीय पर्यटनस्थळ म्हणून उदयास येण्यासाठी वेळ लागणार नाही.

Web Title: The beauty of the Ittiadoh Dam is overwhelmed by the crowds of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण