ऑटो टिप्पर काढण्याचा मुर्हूत निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:14+5:30

नगर परिषदेकडे कचरा संकलनासाठी ऑटो टिप्पर असताना कंत्राटदाराच्या भरवशावर काम चालत असल्याचा निषेध नोंदविण्यात आला. त्यातल्या त्यात नगरसेवक पंकज यादव व लोकेश यादव यांनी स्वच्छता विभागातील अभियंता उमेश शेंडे यांना त्वरीत ऑटो टिप्पर काढण्याच्या सूचना दिल्या. यावर शुक्रवारी (दि.१०) अभियंता शेंडे यांनी २२ ऑटो टिप्पर काढून त्यांना कचरा संकलनासाठी वॉर्डात पाठविले.

The auto tipper removal took place | ऑटो टिप्पर काढण्याचा मुर्हूत निघाला

ऑटो टिप्पर काढण्याचा मुर्हूत निघाला

Next
ठळक मुद्देकचरा टाकताच नगर परिषदेला आली जाग : २२ ऑटो टिप्पर लावले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जुलै महिन्यापासून धूळ खात पडून असलेले ऑटो टिप्पर चालविण्यासाठी नगर परिषदेला अखेर मुर्हूत मिळाला. शुक्रवारी (दि.१०) स्वच्छता विभागाकडून २२ ऑटो टिप्पर काढण्यात आले असून कचरा संकलनासाठी वॉर्डांत पाठविण्यात आले.विशेष म्हणजे, गुरूवारी नगरसेविका ज्योत्सना मेश्राम यांनी कचरा फेकल्याचा हा परिणाम असल्याचे नगर परिषदेत बोलले जात आहे.यावरून कुणी अंगावर आल्यावरच काम करायचे असे काहीसे गणित नगर परिषदेत लावले जात आहे.
१ जानेवारीपासून शहरातील कचरा उचलण्याचे काम देण्यात आलेल्या कंत्राटादाराने काम बंद केले आहे. परिणामी कचऱ्याची उचल होत नसल्याने अवघ्या शहरात कचऱ्याचे ढिगार लागल्याचे दिसून येत आहे. यातच दलित वस्तीत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मधील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे नगरसेविका ज्योत्स्ना मेश्राम त्यांचे पती संदिप मेश्राम व नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी निर्माण झालेली कचऱ्याची समस्या सोडविण्याबाबत पदाधिकाऱ्यांकडे चर्चा केली. मात्र त्यावर काहीच तोडगा न निघाल्याने गुरूवारी (दि.९) त्यांनी वॉर्डातून कचरा उचलून आणला व स्वच्छता विभाग तसेच नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या दालनात टाकला. या घटनेमुळे नगर परिषदेत वातावरण चांगलेच तापले होते.
नगर परिषदेकडे कचरा संकलनासाठी ऑटो टिप्पर असताना कंत्राटदाराच्या भरवशावर काम चालत असल्याचा निषेध नोंदविण्यात आला. त्यातल्या त्यात नगरसेवक पंकज यादव व लोकेश यादव यांनी स्वच्छता विभागातील अभियंता उमेश शेंडे यांना त्वरीत ऑटो टिप्पर काढण्याच्या सूचना दिल्या. यावर शुक्रवारी (दि.१०) अभियंता शेंडे यांनी २२ ऑटो टिप्पर काढून त्यांना कचरा संकलनासाठी वॉर्डात पाठविले. मागील ६ महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरीचे तर कधी मुख्याधिकारी नसल्याचे कारण सांगून सडत ठेवण्यात आलेल्या ऑटो टिप्परचा मुर्हूत अखेर निघाला.
विशेष म्हणजे, नगरसेविका ज्योत्स्ना मेश्राम व नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी गुरूवारी नगर परिषदेत चांगलाच गोंधळ घातल्यानंतर तसेच कचरा आणून टाकल्याने स्वच्छता विभागातील सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मागणी केल्यावर एक गाडी त्यांच्या वॉर्डात पाठविली जात नव्हती. मात्र गुरूवारी त्यांनी आपले उग्र रूप दाखविल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या वॉर्डात एक नव्हे तर दोन गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. याशिवाय स्वच्छता विभागातील सर्वच कर्मचारी वॉर्डांतील कचरा संकलनासाठी नियोजन करीत असल्याचेही दिसले.

त्याच एजंसीवर पुन्हा मेहरबानी
कर्मचाºयांचे ७-८ महिन्यांचे पगार थकवून बसलेल्या एजंसीवर नगर परिषदेने पुन्हा एकदा मेहरबानी दाखवून दिली आहे. आहे त्या कर्मचाºयांचे पगार थकवून ठेवले असताना स्वच्छता विभागाने २२ ऑटो टिप्परसाठी चालक व वाहक त्याच एजंसीकडून घेतले आहेत. एकीकडे सभेत या एजंसीचे काम बंद करण्यासाठी ठराव घेतला जातो. तर दुसरीकडे त्याच एजंसीला कामे देऊन पुन्हा आपूलकी जोपासली जात आहे.यात मात्र कुणाचे कुणाशी अडत आहे हेच कळेनासे झाले आहे. मात्र या एजंसीचे नाळ एखाद्या मोठ्या व्यक्तीशी तर जुळलेले नाही ना अशी चर्चाही नगर परिषद वर्तुळात सुरू आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना राग अनावर
नगर परिषदेत झालेल्या सर्व वादंगाला घेऊन नगरसेवक पंकज यादव व अन्य काहींनी या सर्व प्रकाराला जिल्हाधिकारी जवाबदार असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडून महिने महिने प्रशासकीय मंजुरी दिली जात नाही. परिणामी कामे अडतात असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांना माहिती मिळाल्याने त्यांना राग अनावर झाला असून त्यांनी संबंधित एका अधिकाऱ्याला या विषयाला घेऊन झापल्याची चर्चा आहे. नगर परिषदेत सुरू असलेल्या या सर्व कारभाराला घेऊन आतातरी त्यांनी रोख-ठोक भूमिका घेण्याची गरज आहे असे बोलले जात आहे.

Web Title: The auto tipper removal took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.