आमगाव तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीचा संमिश्र निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:23+5:302021-01-19T04:31:23+5:30

आमगाव : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ६८ उमेदवार विजयी झाल्याचा दावा भाजपने केला आहे. ...

In Amgaon taluka, G.R. Pt. Composite election results | आमगाव तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीचा संमिश्र निकाल

आमगाव तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीचा संमिश्र निकाल

Next

आमगाव : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ६८ उमेदवार विजयी झाल्याचा दावा भाजपने केला आहे.

तालुक्यातील रामाटोला ग्रामपंचायत बिनविरोध झाली तसेच गोसाईटोला ग्रामपंचायत निवडणुकीत ७ पैकी ६ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, एका सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली. भाजपने सर्वाधिक ६८ उमेदवार तर काँग्रेसने ६५, राष्ट्रवादीने ३५, शिवसेनेनेही उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे. तालुक्यातील रामाटोला व गोसाईटोला ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. येथील तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. भोयर यांनी निकाल जाहीर केले. यावेळी महारीटोला व सरकाटोला या ग्रामपंचायतींची मतमोजणी पुन्हा करण्यात आली. मात्र, निकालात काहीही बदल झाला नाही. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.

Web Title: In Amgaon taluka, G.R. Pt. Composite election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.