हसण्या- बागडण्याच्या वयात कोरोनाने हिरावले वडिलांचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 05:00 AM2021-07-28T05:00:00+5:302021-07-28T05:00:22+5:30

आता काही दिवस आईपासून दूर चिमुरडी शेजारच्या घरी असतानाच वडील गेल्यापासून अवघ्या १०-१२ दिवसांत तिच्या पोटात दुखायला लागले आणि शेजाऱ्यांनी डॉक्टरला दाखविले, तर तिला अपेंडिक्स झाल्याचे कळले. प्राचीच्या आजोबांनी गोंदिया येथे नेऊन तिची शस्त्रक्रिया करविली. प्राची आता बरी होऊन घरी आली. तिच्या आईने कोरोनावर मात केली आहे. मात्र, आता पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांना मदतीच्या हातांची गरज आहे.

At the age of laughter, Corona lost her father's umbrella | हसण्या- बागडण्याच्या वयात कोरोनाने हिरावले वडिलांचे छत्र

हसण्या- बागडण्याच्या वयात कोरोनाने हिरावले वडिलांचे छत्र

Next
ठळक मुद्देआई करीत आहे रोवणीची कामे : पैशांअभावी शिक्षणही कठीण : प्राचीला हवा आहे मदतीचा हात

नरेंद्र कावळे
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव :  मागील दीड वर्ष प्रत्येक जण आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीचा सामना करीत आहे. कोरोनाच्‍या या हाहाकारात अनेक बालके अनाथ झाली. अशा बालकांच्‍या जीवनात कोरोनामुळे अंधार निर्माण झाला. अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुक्यातही काही कुटुंबांवर कोरोनामुळे दुःखाचे डोंगर कोसळला आहे. त्यात वडिलांचे छत्र हरविलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीला मदतीचा हात हवा आहे.
जेमतेम ३५ वर्षे वय असलेल्या संतोष राऊत  यांचे  एप्रिल महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. संतोष यांची परिस्थिती हलाखीची होती. चौथ्या वर्गात शिकत असताना व  खेळण्याचे वय असताना वडिलांचे छत्र हरविल्याने आजोबांनी (आईचे वडील) संतोष यांचे संगोपन केले.  आजोबांसोबत छोट्याशा झोपडीत ते राहायचे व मोलमजुरी करून आजोबांनी त्यांना शिक्षण दिले. पदवीचे शिक्षण घेत असताना आजोबा वारले. शिक्षणासोबत घड्याळ दुरुस्तीचे काम करून संतोष आपला उदरनिर्वाह करीत होते. घड्याळ दुरुस्तीच्या कामातून मिळालेल्या पैशांतून छोटेसे घर बांधून कुणाचा आधार नसल्याने स्वतःची मेहनत व कष्टावर त्यांनी लग्न केले. कुटुंबाचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी ही जबाबदारी सर्मथपणे पेलली होती. त्यांच्या  संसारात एका लहान परीचे आगमन झाले. मुलीला चांगले शिक्षण द्यायचे, तिचे उज्ज्वल भविष्य घडवायचे, हे स्वप्न उराशी बाळगून संतोष सर्व अडचणी व संकटांवर मात करीत होते; परंतु नियतीला हे मान्य नव्हते. संतोष यांचे कोरोनामुळे एप्रिल महिन्यात निधन झाले. नऊ वर्षांच्या प्राचीला काही कळेना. आई पण कर्णबधिर आणि वडिलांच्या संपर्कात आल्यामुळे आईला पण कोरोना झाला. त्यामुळे तिला शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आले. प्राचीने वडिलांना बघितलेसुद्धा नाही. आता काही दिवस आईपासून दूर चिमुरडी शेजारच्या घरी असतानाच वडील गेल्यापासून अवघ्या १०-१२ दिवसांत तिच्या पोटात दुखायला लागले आणि शेजाऱ्यांनी डॉक्टरला दाखविले, तर तिला अपेंडिक्स झाल्याचे कळले. प्राचीच्या आजोबांनी गोंदिया येथे नेऊन तिची शस्त्रक्रिया करविली. प्राची आता बरी होऊन घरी आली. तिच्या आईने कोरोनावर मात केली आहे. मात्र, आता पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांना मदतीच्या हातांची गरज आहे.
 

शिक्षण व आरोग्यासाठी हवी मदतीची गरज 

- घरी राहून पोटाची खळगी भरणार नाही, म्हणून  उदरनिर्वाहासाठी प्राचीची आई रोवणीच्या कामाला जात आहे. प्राची शेजारच्या मदतीने घरी एकटीच असते. सायंकाळी आई येण्यापूर्वी घर झाडून काढणे, भांडी घासणे करून आईची वाट पाहत असते. ती सध्या चौथ्या वर्गात असून, तिला शिकण्याची खूप आवड आहे. शासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही.  प्राचीचा उत्साह वाढविण्याची गरज असून, पुढील शिक्षण व आरोग्यासाठी मदतीची गरज आहे.
 

 

Web Title: At the age of laughter, Corona lost her father's umbrella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.