पाणी टंचाईसाठी १९१६ उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:00 AM2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:02+5:30

जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, १४८० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, १६९ विहिरींचे खोलीकरण ३ नवे बोअर करणे, २ गावांत तात्पुरती नळ योजना करणे व ५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत.

1916 Measures for water scarcity | पाणी टंचाईसाठी १९१६ उपाययोजना

पाणी टंचाईसाठी १९१६ उपाययोजना

Next
ठळक मुद्दे६६३ गावे व वाड्यांना सुविधा : ४.४८ कोटींची विशेष तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तिसºया टप्यात एकूण ६६३ गावे व वाड्यांसाठी १९१६ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत, नवीन विंधन विहिरी, विहीरींची विशेष दुरुस्ती व विहिरींचे खोलीकरण, तात्पुरती पुरक नळयोजना याप्रमाणे एप्रिल ते जून या कालवधीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, १४८० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, १६९ विहिरींचे खोलीकरण ३ नवे बोअर करणे, २ गावांत तात्पुरती नळ योजना करणे व ५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत बºयाच पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहेत. त्यातच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जावे यासाठी गावात विहिरी, हातपंप व काही खाजगी विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तरी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे.
यावर्षी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या कशाप्रकारे मार्गी लावता येईल या दृष्टीने यंदा १९१६ उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील एकूण १११ गावे व वाड्यांमध्ये १३३ उपाययोजना, गोरेगाव तालुक्यातील १७८ गावे-वाड्यांमध्ये ३७४, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ गावे-वाड्यांमध्ये १९८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९४ गावे- वाड्यांमध्ये ३०३, तिरोडा तालुक्यातील ९५ गावे-वाड्यांमध्ये २६०, सालेकसा तालुक्यातील ४९ गावे- वाड्यांसाठी ४१०, देवरी तालुक्यातील २९ गावे-वाड्यांमध्ये ९८ तर आमगाव तालुक्यातील ५२ गावे-वाड्यांमध्ये १४० उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

४.४८ कोटींची तरतूद
प्रत्येक तालुक्यात करण्यात येणाºया उपाययोजनांनुसार निधीची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यासाठी २५ लक्ष ४० हजार, गोरेगाव ७५ लक्ष ८५ हजार, सडक-अर्जुनी ५९ लक्ष ९० हजार, अर्जुनी-मोरगाव ४२ लक्ष, तिरोडा एक कोटी ५५ लक्ष, सालेकसा ८८ लक्ष ३६ हजार, देवरी ११ लक्ष २० हजार व आमगाव तालुक्यासाठी ४५ लक्ष ९५ हजार अशाप्रकारे चार कोटी ४८ लक्ष ४१ हजार रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: 1916 Measures for water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.